शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी एका सामान्य नागरिकाची थेट कृषीमंत्र्यांशी भेट… कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे याबाबत सकारात्मक पावलं उचलली जातील, असे आश्वासन…

पनवेल प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात कळंबोली येथील ईश्वर नारायण जाधव यांनी एक सामान्य नागरिक म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी थेट कृषी मंत्र्यांशी भेट घेतली. शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याठी आवश्यक उपाययोजनांच्या संदर्भात मा ना श्री दादाजी भुसे साहेब (कृषिमंत्री- महाराष्ट्र राज्य) यांना निवेदन दिले आहे.

मा मंत्री महोदय यांच्याकडे ईश्वर नारायण जाधव यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वेळ मागितली होती. तसं पाहिलं तर ईश्वर नारायण जाधव कळंबोली येथे राहत असून स्वतः शेती करतात असं नाही. ते मुळचे अंदोरी (जिल्हा सातारा) येथील असून तळोजा एमआयडीसीतील टेक्नोव्हा कंपनीत जॉब करतात. मात्र आपण एका शेतकऱ्याच्या मुलगा म्हणून शेतकऱ्यांना काय समस्या भेडसावत आहेत,यावर महाराष्ट्र सरकारने कोणत्या उपाययोजना करायला पाहिजेत या संदर्भात कृषीमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आपण त्यांना भेटलो आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काय करायला पाहिजे, तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांच्या संदर्भात काय वाटतं याबाबत माहिती देऊन मंत्री महोदयांना निवेदन दिल्याचे श्री ईश्वर नारायण जाधव यांनी सांगितले. दरम्यान, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी याबाबत सकारात्मक पावलं उचलली जातील, असे आश्वासन दिले आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, शेतकरी हा ग्रामव्यवस्था आणि कृषि समाजरचनेचा कणा आहे म्हणून, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, यावर अंमलबजावणी करावी. महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना  पाणी, वीज आणि शेतात जाणारे रस्ते या तीन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे . नांगरणी करताना शेजारील शेतकऱ्याचा बांध कोरल्यास किंवा शेतात जाणारा रस्ता अडवल्यास यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. शेतकऱ्यांना लागणारी शेतीची अवजारे बी-बियाणे तसेच रासायनिक खते करमुक्त करणे व कमी किमतीत मिळवून देणे गरजेचे आहे.आर्थिक दृष्ट्या जे गरीब आहेत,त्यांना सरकारी सुविधा जरूर मिळाल्या पाहिजे तालुका पातळीवर शासनाच्या साहाय्याने बाजारपेठा उपलब्ध करून देणे जेणेकरून शेतकरी ते थेट थेट ग्राहक मालाची खरेदी-विक्री करता येणे शक्य होईल.आणि शेतकऱ्यांना मुबलक असा नफा मिळू शकेल. शेतकऱ्यांसाठी सहकारी तत्त्वावर कोल्ड स्टोरेज उभारणे. शेतीमाल विक्री व्यवस्था सक्षमीकरण तसेच सहकारी तत्त्वावर कृषी उद्योग उभारणी करण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच शेतकरी शेतीसह जे जोड व्यवसाय करतात त्यासाठी लागणारे भांडवल कमी व्याजदराने कर्ज पुरवठा करावा यासाठी प्रयत्न करावेत. शेतमजुरांच्या मुला-मुलींना शैक्षणिक योजनेअंतर्गत सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत.शेतकऱ्यांना वीज पुरवठा दिवसभरात जास्तीत जास्त देण्यात यावा शेतकऱ्यांसाठी विहिरी व शेततळे उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.यासाठी सरकारी योजनेची अंमलबजावणी करावी असे निवेदनात मांडण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *