पनवेल महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट पोल उभारण्याकरिता बसवण्यात आलेल्या सळ्यांच्या बांधकामामुळे नुकसान…

पनवेल महानगरपालिकेच्या स्ट्रीट लाईट पोल उभारण्याकरिता बसवण्यात आलेल्या सळ्यांच्या बांधकामामुळे नुकसान… पनवेल मधील लाईनाळी परिसरातील वाघेज वडापाव शॉप समोर चारचाकी लाईट पोल उभारण्याकरिता बसवण्यात आलेल्या सळ्यांच्या बांधकामामुळे नुकसान झाले. आपण पाहू शकता कश्याप्रकारे हे अर्धवट बांधकाम महानगरपालिकेकडून करण्यात आले. येथून दररोज वाहनांची वरदळ असते. तसेच
वाघे वडापाव जवळील स्पर्श हॉस्पिटल कडे जाणारा रस्ता आहे.या अश्या अर्धवट बांधकामामुळे अनेक चारचाकी – दुचाकी गाड्यांचे नुकसान होताना दिसून येतं आहे व झालिही आहेत. दि 16 मार्च रोजी शिवसेनेचे जेष्ठ नेते श्री विश्वास पेटकर यांच्या गाडीचे नुकसान झालेले पाहायला मिळेल. त्यांच्या गाडीसह अजून 3 गाड्यांचे असे नुकसान झाले आहे. यावर आता महानगर पालिकेने याची दखल घेऊन हे अर्धवट बांधकाम पूर्ण करावे हीच विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *