केमस्पेक केमिकल मध्ये सुरक्षा सप्ताह संपन्न…

केमस्पेक केमिकल मध्ये सुरक्षा सप्ताह संपन्न
पनवेल ता.१७(वार्ताहर)- तळोजा औधोगिक वसाहती मधील केमस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड तळोजा येथे 50 वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह संपन्न सुरक्षा विभाग प्रमुख डी पी शेगेकर यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन.
केमस्पेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या औधोगिक कारखान्यात सुरक्षा सप्ताहा निमित्त कामगार आणि कामगारांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुरक्षा पोस्टर स्पर्धा, सुरक्षा कविता, सुरक्षा निबंध आणि सुरक्षा घोषवाक्य अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या स्पर्धांमधून अव्वल नंबर पटकावलेल्या कामगारांना बक्षीस वितरित करण्यात आले. या सप्ताहात दरम्यान कारखाने मध्ये विविध प्रकारच्या सुरक्षा विषयक प्रत्येकक्षीकांचे आयोजन आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तलोजा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व तळोजा चे फायर सेफ्टी ऑफिसर दीपक दोरुगडे उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे डायरेक्टर राजिंदर हरकारा,प्रबंधक संदीप ओझा, सुरक्षा विभाग प्रमुख डी पी शेगेकर व श्याम आहिरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर सदाशिव आढागळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *