40+ मास्टर्स सामाजिक कला क्रिडा मंडळातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाखांचा धनादेश
पनवेल दि.23 (वार्ताहर)- 40+ मास्टर्स सामाजिक कला क्रिडा मंडळ उलवे नोडच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी कोव्हिड-19ला 1 लाखांचा धनादेश गुरूवारी पनवेल नायब तहसिलदार दत्ता आदमाने यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष हनुमान भोईर, विजय खारकर खजिनदार, संदिप म्हात्रे, शैलेश चिर्लेकर, शंकर नाईक यांच्या मार्फत हा सुूपूर्त करण्यात आला. यासाठी मंडळाचे अध्यक्ष राजन भोईर, कार्याध्यक्ष अशोक भोईर, सचिव जितेंद्र सोमासे, सल्लागार प्रदीप पाटील यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच उलवे नोड 40+ संघ, उलवा, कोंबडभुजे, नावातरघर, मोहा वहाळ, गणेशपुरी, गव्हाण, बामण डोंगरी यांचे सहकार्य लाभले.
40+ मास्टर्स सामाजिक कला क्रिडा मंडळ उलवे नोडच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला 1 लाखांचा धनादेश पनवेल नायब तहसिलदार दत्ता आदमाने यांच्याकडे सुपूर्त करताना पदाधिकारी