जागतिक महिला दिनानिमित्त आर्या वनौषधी संस्थेंच्यावतीने पनवेल, पालघर येथे वृक्ष वाटप,वृक्ष रोपण, वृक्षांचा वाढदिवस आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

जागतिक महिला दिनानिमित्त आर्या वनौषधी संस्थेंच्यावतीने पनवेल, पालघर येथे वृक्ष वाटप,वृक्ष रोपण,वृक्षांचा वाढदिवस आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमातस जेष्ठ पत्रकार संजय कदम, आर्या प्रहरचे पालघर जिल्हा प्रतिनिधी राजेश संखे ,अतुल वझे, मुकेश सिंह, अमेय पिंपळे, संतोष कोरे,जितेंद्र सावे,हरेश जळे, विलास घरत,विक्रम येवले, नितीन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी महिलांसाठी उपयुक्त अशा रिठा, धायटी, सीतेचा अशोक, कांचनार, शतावरी आदी औषधी वनस्पतींची सखोल माहिती दिली.या आगळ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांस महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी मेघना संजय कदम, मानसी जामकर, नलिनी तटकरे ,मनाली म्हात्रे, शकुंतला म्हात्रे आदी महिलांना सीतेचा अशोक, ब्राम्ही, गुडमार, कडू चिरायता, दमवेल, अश्वगंधा, शतावरी आदी औषधी रोपे वाटप करण्यात आली. महिला दिनाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मौसमी तटकरे, प्रियांका पाटील आदी महिलांना या वेळी सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. नेरे येथील स्नेहकुंज आधारगृहात संगीता नितीन जोशी यांच्या हस्ते सीतेचा अशोक या वृक्षाचे रोपण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *