पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथे असलेल्या मॅरेज हॉल येथील तरूण विवाहित व्यवसायिकाने अज्ञात कारणावरून राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

तरूण व्यवसायिकाची आत्महत्यापनवेल दि.28 (वार्ताहर): पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथे असलेल्या मॅरेज हॉल येथील तरूण विवाहित व्यवसायिकाने अज्ञात कारणावरून राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
         तालुक्यातील आकुर्ली येथे चौधरी कुटूंबियांचे काकाजीनी वाडी मॅरेज हॉल हे सुप्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणी मोठ्या प्रामाणात लग्न, साखरपुडे व इतर कार्यक्रम होत असतात. सदर व्यवसाय करणारे सागर मनोज चौधरी (वय-27) यांनी त्यांच्या हॉलमध्ये कार्यक्रम सुरू असताना तेथे असलेल्या त्यांच्या घरातील बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या गळफास घेऊन आत्महत्याकेल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *