भाजी आणण्यास गेलेल्या वृद्धेची केली फसवणूक…

भाजी आणण्यास गेलेल्या वृद्धेची केली फसवणूक पनवेल दि.28 (वार्ताहर): भाजी आणण्यास गेलेल्या एका वृद्ध महिलेची फसवणूक तोतया पोलिसाने केल्याची घटना खारघर वसाहतीत घडली आहे.           कुसूम ठक्कर (वय-62) या से.-7 खारघर येथे भाजी आणण्यास गेल्या असताना तेथे काही अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले व आम्ही पोलिस असल्याची बतावणी करून तुमच्या अंगावरील दागिने काढून एका कागदात ठेवा असे सांगून त्यांना बोलण्यात गुंगवून हातचलाखीने सदर तोतया पोलिसांनी 2 लाख 35 हजार रूपये किंमतीचे दागिने लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबतची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.       
मोटारसायकलीची चोरीपनवेल दि.28 (वार्ताहर): शहरातील नवनाथ मंदिराजवळ उभी करून ठेवलेली 35 हजार रूपये किंमतीची होंडा शाईन मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
        बुताली  निगप्पा पूजारी (वय-27) याने त्याचीहोंडा शाईन मोटारसायकल क्र.-एमएच 46 बीआर 6041 काळा रंगाची नवनाथ मंदिराजवळ मालधक्का रोडच्या बाजूला उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर मोटारसायकल चोरून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *