मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष उभे राहून करून घेतली झाडेझुडपे सफाई.

मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी प्रत्यक्ष उभे राहून करून घेतली झाडेझुडपे सफाई.
अमरधाम ते वीर सावरकर चौक या रस्त्यावरील ओपन प्लॉट वर बरीच झाडेझुडपे वाढली होती,त्यामुळे डास, किडे यांचा प्रादुर्भाव वाढला होता आणि सोसायटी मध्ये साप येणे अशा गोष्टी वारंवार होऊ लागल्या होत्या. परिसरातील रहिवाशांनी ही समस्या प्रभागातील कार्यक्षम नगरसेवक तथा मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांची भेट घेऊन सांगितली.दुसऱ्या दिवशी विक्रांत पाटील यांनी जेसीबी मागवून व प्रत्यक्ष उभे राहून पूर्ण झाडेझुडपे साफ सफाई करून घेतली.
प्रभागातील समस्यांचे तत्परतेने निरसन करणारा नगरसेवक लाभल्याबद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले.या प्रसंगी विक्रांत पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना आव्हान केले की त्यांनी आपल्या कोणत्याही समस्या अथवा सूचना यासाठी केव्हाही हक्काने ९१६७०४२६६६ या हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा,त्यांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी त्वरित प्रयत्न केले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *