पोलीस बांधवांच्या सुरक्षेसाठी जयहिंद फौंडेशन आले धावून

संपूर्ण देशभरात माजी सैनिक तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी जयहिंद फाऊंडेशन ही संस्था निःस्वार्थ पणे काम करत असते.

सैनीक हो तुमच्यासाठी देशभर सध्या कोरोनाचे संकट असताना सामाजिक बांधिलकी म्हणून संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. संदीप माने ह्यांच्या मार्गदर्शनानुसार जयहिंद फाऊंडेशन तर्फे संपूर्ण देशभरात अन्न धान्य वाटप, तसेच सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात येत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून दिवसरात्र मेहनत करणाऱ्या पोलीस बांधवांप्रती सामाजिक बांधिलकी म्हणून पोलीस बांधवांच्या सुरक्षेसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालया अंतर्गत कामोठे आणि खारघर पोलीस स्टेशन येथे सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप जयहिंद फॉउंडेशन तर्फे करण्यात आले. यावेळी पोलीस बांधवांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना प्रशासन देईल ती जबादारी स्वीकारण्यास जयहिंद फॉउंडेशनचे सैनिक तयार असल्याचे मत श्री. मंगेश अढाव व्यक्त केले . ह्यावेळी जय हिंद फाऊंडेशनचे *मंगेश अढाव, बापू साळुंखे आणि अल्पेश माने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *