मंदिर उघडल्याबद्दल पुजार्याविरुद्ध कारवाई …
आज दि २०/४/२० रोजी सकाळी ०६.०० ते ११.०० वा. दरम्यान लॉकडाऊनमध्ये सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आवाहन शासना मार्फत करण्यात आले असतानाही तालुक्यातील केरूमाता मंदीर, वाघीवली वाडा, ओवळे, पनवेल येथील पुजाऱ्याने सदरचे मंदीर जनतेला दर्शनासाठी उघडल्याची माहिती मिळाल्याने व त्या ठिकाणी ओवळे, पारगाव, डुंगी, दारोली परिसरातील काही नागरिक दर्शनासाठी गेल्यावे सदर पुजाऱ्यास ताब्यात घेवून त्याचेविरूद्ध गुन्हा रजि. नंबर १८०/२०२० भादंवि कलम १८८, २६९, २७०, २७१, २९० सह महा. पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/ १३५ सह साथरोग प्रतिबंध अधिनियम १८९७ चे कलम २, ३, ४ सह महा. कोव्हिड-१९ उपाययोजना नियम २०२० मधिल नियम ११, सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यास सी.आर.पी.सी. कलम ४१ (१) अ प्रमाणे नोटीस देवून सोडले आहे.