सहजयोगातून घालवा तणावाला दूर; मोफत ऑनलाईन उपक्रमाला मिळतोय मोठा प्रतिसाद
पनवेल, दि.19 (वार्ताहर)- माणूस सतत कार्यरत असेल तर त्याची मनस्थिती चांगली राहते जर तो कार्यरत नसेल तर हळूहळू कंटाळवाणे होत जाते. नंतर त्याच्या पाठोपाठ नैराश्य, चिंता येतात सध्यातर लॉक डाउन मूळे लोक घरातच आहेत. त्यामुळे त्यांच्यात निर्माण झालेली चिंता, भीती,नैराश्य आणि मानसिक तणावातून बाहेर पडण्यासाठी मोफत ऑनलाईन सहजयोग ध्यान उपक्रमात विभागातील सातशेच्यावर साधक सहभागी होत आहेत .
प.पु. माताजी श्री. निर्मलादेवी यांनी सुरू केलेल्या सहजयोग ध्यानसाधनेच्या माध्यमातून गेल्या ५० वर्षात असंख्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय साधकांना नकारात्मक, नैराश्यपूर्ण परिस्थितून बाहेर येण्यास मदत होत असून त्यांना आरोग्य,शांती, समाधान व आनंद प्राप्त होऊन ते संतुलित जीवन जगत असल्याचे रायगड जिल्हा सहजयोग समन्वक यांनी सांगितले. लॉक डाउनच्या या कठीण काळात ५९ देशातील सुमारे दोन लाख साधक दररोज एकाच वेळी सकाळी साडे पाच व सांयकाळी सात वाजता ऑनलाईन ध्यानाच्या माध्यमातून आप आपल्या घरी बसून ध्यान साधना व विश्व कल्याणाची व कोविड-१९ हा विषाणू नष्ट होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. या माध्यमातून निर्माण होणाऱ्या सकारत्मक चैतन्य लहरीतून संसर्गजन्य विषाणूचा प्रभाव कमी होण्यास मदत होईल. लॉक डाउन च्या काळात सर्वजण त्यांच्या घरीच आहेत अशावेळी साधकांना आंतरीक शक्तीची जाणीव होण्यासाठी दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत सहजयोग ध्यान साधना शिकवली जात आहे. युट्युब च्या माध्यमातून हजारो नवीन साधक याचा फायदा घेत आहेत. सहजयोग ध्यान प्रणालीने आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहते याची प्रचिती नियमित ध्यान साधनेने येते.
सहभागासाठी टोल फ्री क्रमांक
महाराष्ट्र राज्यातील १३४४ ध्यानकेंद्र आणि सर्व सहजयोगी साधक दि. १५ मार्च पासून प्रशासनाच्या निर्णयाप्रमाणे सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत आहेत सर्व नागरिकांना विनामूल्य ध्यान ऑनलाईन माध्यमातून शिकविले जात आहे विभागात नवीन साधक ऑनलाईन साधनेत सहभागी होत आहेत. यात सहभागासाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १८००३०७००८०० वर संपर्क करावा आणि लॉक डाउन च्या काळात निराश न होता ध्यानाने आपले आत्मिक बळ वाढवावे असे आवाहन सहजयोग राज्य समिती व रायगड जिल्हा सहजयोग परिवार तर्फे करण्यात येत आहे.