मोबाईल चोरुन पसार झालेल्या आरोपीस 10 महिन्यानंतर तालुका पोलिसांनी केली अटक…

मोबाईल चोरुन पसार झालेल्या आरोपीस 10 महिन्यानंतर तालुका पोलिसांनी केली अटक ; वपोनि रवींद्र दौंडकर यांचे होतेय सर्वत्र कौतुक
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः रेल्वे प्रवासा दरम्यान प्रवाशाच्या हाताला लाकडी काठीचा फटका मारुन त्यांचा महागडा मोबाईल चोरुन पसार झालेल्या आरोपीस अखेरीस पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे कार्यदक्ष वपोनि रवींद्र दौंडकर व त्यांच्या पथकाने भुसावळ येथून तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे. 10 महिन्यानंतर मोबाईल परत मिळाल्याने फिर्यादी शनिकुमार पाटील यांनी तालुका पोलिसांचे विशेष कौतुक केले आहे.
पनवेलजवळील सोमटणे रेल्वे स्टेशन, ट्रॅकच्या बाजूला उभ्या असलेल्या आरोपीने फिर्यादी शनिकुमार पाटील याच्या हातावर लाकडी काठीचा फटका मारूंन त्यांच्या हातातील महागडा मोबाइल फोन खाली पाडून तो चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. या प्रकारची तक्रार पनवेल रेल्वे पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती. मोबाइल चोरीच्या तक्रारीवरून पनवेल रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून ही हद्द तालुका पोलीस स्टेशनची असल्याने गुन्हा हा पुढील तपासासाठी पनवेल तालुका पोलीस स्टेशनकडे वर्ग केला होता. फिर्यादी शनिकुमार यशवंत पाटील हा रत्नागिरी दादर पॅसेंजरने पेण ते पनवेल असा रेल्वे प्रवास करीत होता. तो सोमटणे रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर पनवेल येथे उतरण्यासाठी ते त्यांचा मोबाईल फोन हातात घेऊन रेल्वे डब्याचे दरवाजात आले असताना, रेल्वे ट्रॅकचे बाजूला उभ्या असलेल्या आरोपीने लाकडी काठीचा फटका त्यांच्या हातावर मारला आणि त्यांच्या हातातील मोबाइल फोन खाली पाडून तो चोरून पळून गेला. गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक रवीद्र दौंडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि नितीन बडगुजर यांनी तांत्रिक तपास करून अधिक माहिती घेतली असता सदर मोबाईल फोन हा परराज्यात वापरला जात असल्याचे समजले. त्यानुसार वापरणार्‍या व्यक्तीचा शोध घेवून त्याच्याकडून मोबाईल ताब्यात घेण्यात आला व सदर मोबाईल कोेणाकडून विकत घेतला असल्याची माहिती घेवून आरोपी जावेद्दीन समसूहीन शेख, (23) याला भुसावळ येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *