दुकानातील घरफोडीत लाखोचा ऐवज लंपास…

दुकानातील घरफोडीत लाखोचा ऐवज लंपास…
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः बंद दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी लॉक तोडून शटर उघडून त्याद्वारे आत प्रवेश करून दुकानातील रोख रक्कम मोबाईल फोन व स्पीकर असा मिळून जवळपास 2,92,150/- रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना खारघर वसाहतीमध्ये घडली आहे.
कृष्णकुमार माली यांच्या बंद दुकानाचे लॉक तोडून अज्ञात चोरट्यांनी शटर उघडून आत प्रवेश केला व दुकानातील मोबाईल फोन, रोख रक्कम व स्पीकर असा मिळून जवळपास 2,92,150 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *