शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण यांचा पुढाकार पुढाकार….!
पनवेल कोर्टालगतच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास .
शिवसेनेचे चंद्रशेखर सोमण यांचा पुढाकार पुढाकार….!
पनवेल मध्ये सुरु झालेल्या नवीन न्यायालयाजवळ तेथील कामकाजामुळे होणारी गर्दी आणि पर्यायाने होणारी वाहतूक कोंडी हि नित्याचीच झालेली आहे. तेथील स्थानिक नागरिक आणि कामासाठी जिल्ह्यातून विविध ठिकाणाहून येणारे लोक यांमध्ये रोजच्यारोज वाद, भांडणे होत असतात. सकाळी १० ते ५ या वेळेत होणारी गर्दी , बेशिस्त पार्किंग या मुळे परिसरात दिवसभर गोंधळाची परिस्थिती असते. त्यातच कोर्टालगतच्या रस्त्यावर गटार बांधण्यासाठी दोन्ही बाजूचे रस्ते गेल्या २ महिन्यायपासून खोदून ठेवले आहेत, त्याचा कोर्टासाठी मोठा अडसर निर्माण झाला आहे. तर अशोक बाग कडील रस्ता काँक्रिटीकरणासाठी बंद असल्याने कोर्ट परिसरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेनेचे स्थानिक नेते , सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर सोमण यांच्या हि बाब स्थानिक नागरिकांनी बुधवारी लक्षात आणून देताच महापालिकेशी संपर्क करून प्रकल्प अभियंते संजय कटेकर व शहर अभियंते साळुंके याना जागेवर बोलावून घेतले. एक बाजूचा रस्ता बंद असताना उर्वरित रस्त्यावर गटारे खोदून त्याचे नियोजनशून्य व कासवगतीने सुरु केलेल्या कामाबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांना सोमण यांनी धारेवर धरले व प्रत्यक्ष रोज होत असलेली वाहतुकीची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. शिवसेनेच्या या दणक्याने महापालिकेचा बांधकाम विभाग खडबडून जागा झाला. संजय काटेकर यांनी त्वरित हालचाली करून काँक्रिटीकरण होत असलेली रस्त्याकडील बाजूकडे खडी, भराव टाकून कोर्टाच्या रस्त्याला जोडून घेतला. त्यामुळे कोर्टाकडून महामार्गाकडे जाणारी एक मार्गिका त्वरित चाकू करून दिली. आणि कोर्टालगतच्या रस्त्यावरील गटाराच्या कामाचे डेब्रिज १ ते २ दिवसात उचलून घेण्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांनी सोमण यांना दिले. त्या प्रमाणे काल गुरुवारी बऱ्यापैकी प्रमाणात डेब्रिज बाजूला करून काही अंशी रस्ता मोकळा करण्यात आला आहे.