मा ना. कु. आदीतीताई तटकरे (पालकमंत्री) यांनी पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रात रिक्षा चालकांना सरकारने तातडीने मदत करावी

पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रात रिक्षा चालकांना सरकारने तातडीने मदत करावी….

प्रशासनामार्फत संपूर्ण देशभर कोरोना संकटाला सामोरे जाण्यासाठी संचारबंदी केली आहे, पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील हजारो रिक्षा चालक आणि छोटे टेम्पो चालक अडचणीत आले आहेत. गेला महिनाभर कामधंदा एकदम ठप्प असल्यामुळे पोटापाण्याची समस्या निर्माण झाली आहे. सरकारने त्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी सर्वसामान्य रिक्षा आणि टेम्पो चालकांकडून करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता अजून किती दिवस या संकटाला सामोरे जावे लागेल हे माहीत नसल्याने रिक्षा चालक आणि छोटे टेम्पोचालक यांच्यामध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. त्यांना धीर देण्यासाठी सरकारने एक पाऊल पुढे टाकत बॅच असणाऱ्या रिक्षाचालकाना आर्थिक मदत शासनाकडून व्हावी अशी विनंती पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्यध्यक्ष सुदाम पाटील यांनी पत्रा द्वारे मा ना. कु. आदीतीताई तटकरे (पालकमंत्री) यांना केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *