400 वर्षीय पुरातन असलेले चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाजाचे लक्ष्मी नारायण मंदिर पनवेलची वाढविणार शोभा…

400 वर्षीय पुरातन असलेले चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाजाचे लक्ष्मी नारायण मंदिर पनवेलची वाढविणार शोभा..
पनवेल, दि.8 (संजय कदम) ः चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाजाचे 400 वर्षीय पुरातन असलेले लक्ष्मी नारायण मंदिराचा आता जिर्णोद्धार होत असून त्याच्या आगळ्या वेगळ्या अध्यात्मिक रुपामुळे पनवेलमध्ये हे मंदिर म्हणजेच पनवेलची शोभा वाढविणारे देवस्थान ठरणार आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज रोडवर लक्ष्मी नारायण मंदिर असून 400 वर्षीय पुरातन असे मंदिर असल्याने त्याचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प कमिटीने घेतला. यावेळी त्यांनी समाजाकडून देणगी व इतरांकडून मदत घेण्याचे ठरविले. परंतु पनवेलमधील सुप्रसिद्ध उद्योजक राजू गुप्ते यांच्या मातोश्री कांता कृष्णकांत गुप्ते यांनी सदर मंदिराचा जिर्णोद्धार आपल्या मार्फत व्हावा असे त्यांचे सुपूत्र राजू गुप्ते यांना सांगितले. त्यानुसार राजू गुप्ते यांनी सदर कमिटीकडे प्रस्ताव दिला व पूर्ण मंदिराचा जिर्णोद्धार करून देतो असे सांगितले. त्यानुसार सदर मंदिराचे जिर्णोद्धार काम पूर्णत्वास आले असून रविवार दि.10 जानेवारी 2021 रोजी या मंदिराचा वास्तू शांती होम पुण्याह वाचन तसेच नवीन मुर्तींची प्राणप्रतिष्ठा व इतर धार्मिक विधी राजू गुप्ते व त्यांच्या पत्नी मुक्ता यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर सायंकाळी 6 वाजल्यापासून सर्व पनवेलकरांसाठी हे मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे.
कोट
या मंदिराचा जिर्णोद्धार व्हावा यासाठी कै.राजेश राजे यांनी मोठा पुढाकार घेतला होता व त्यांची इच्छा होती. परंतु कोरोनाच्या काळात त्यांचे दुःखद निधन झाले. ही अत्यंत क्लेशदायक घटना दरम्यानच्या काळात घडली. परंतु या मंदिराचे कमिटी सदस्य एस.एस.चितळे, गौरी राजे, गिरीश गडकरी, नितीन देशमुख आदींनी मंदिराचा जिर्णोद्धार पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष सहकार्य केले. ः उद्योजक राजू गुप्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *