विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती…
विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केली स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती..
नागरिकांनी मानले विरोधी पक्ष नेत्यांचे आणि स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांचे आभार
पनवेल, ता.7 ( प्रतिनिधी ) पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून देखील कळंबोली गावात प्रवेश करण्यासाठी वापरात असलेल्या प्रवेश द्वारावरील रस्ते दुरुस्ती केली जात नसल्याने नाराज असलेल्या ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत पालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी सांग स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती करून दिल्या बद्दल ग्रामस्थांनी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे तसेच स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांचे आभार मानले आहेत.प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोडणाऱ्या कळंबोली गावात प्रवेश करण्यासाठी वापरात असलेल्या कळंबोली प्रभाग कार्यालयाकडील रस्ता, सद्गुरू बेठक सभागृहकडे जाणारा रस्ता तसेच जिल्हा परिषद शाळे कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती प्रवेश द्वारावरच झालेली ही दुरावस्था दुर करण्यात यावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी पालिका प्रशासनाकडे व सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे केली होती. ग्रामस्थांकडून केल्या जाणाऱ्या या मागणीची दखल घेतली न गेल्याने नाराज असलेल्या नागरिकांनी अखेर स्थानिक नगरसेवक रवींद्र भगत यांच्या माध्यमातून पालिकेतील विरोधी पक्ष नेत्यांच्या कानावर आपली कैफियत मांडल्याने विरोधी पक्ष नेत्यांनी तात्काळ नागरिकांच्या मागणीची दखल घेत स्वखर्चाने रस्ते दुरुस्ती करून दिल्याने स्थानिक नागरिक प्रल्हाद चौधरी, संजय थोरबोले, वीरेंद्र लोखंडे यांनी विरोधी पक्ष नेते तसेच नगरसेवक भगत यांचे आभार मानले आहेत.