पत्रकार दिनानिमित्त आदिवासी पाड्यावर मायेचे उपक्रमांतर्गत वाटप पत्रकार मंच व प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट यांचा उपक्रम ..

पत्रकार दिनानिमित्त आदिवासी पाड्यावर मायेचे उपक्रमांतर्गत वाटप पत्रकार मंच व प्रल्हाद राय झुलेलाल ट्रस्ट यांचा उपक्रमपनवेल / प्रतिनिधी : पत्रकार म्हटले की लोकशाहीचा चौथा स्तंभ व समाजाचा आरसा तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी निःस्वार्थीपणे झटणारी व्यक्ती म्हणजेच पत्रकार. आज दिनांक ६ जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी मराठी वृत्तपत्र दर्पण बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले होते. पत्रकार दिनानिनित्त पनवेल तालुका पत्रकार मंच व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्यावतीने मायेची ऊब उपक्रमांतर्गत धुंदरे येथील आदिवासी पाड्यावर ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. यावेळी पनवेल तालुका पत्रकार मंचाचे अध्यक्ष माधव पाटील, संजय कदम, विवेक पाटील, हरेश साठे, नितीन कोळी, प्रवीण मोहोकर, रवींद्र गायकवाड, प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे ऍड. मनोहर सचदेव, विशाल सावंत, ओमकार महाडिक यांच्यासह गावातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *