पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा अभिनव उपक्रम…

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचा अभिनव उपक्रम…
………………………………………
आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
……………………………………….
नवीन पनवेल(प्रतिनिधी): पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून दर्पणकार दिवंगत बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीपित्यर्थ गरजू आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पनवेल तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी या आदिवासी पाड्यावर पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, जेष्ठ सल्लागार प्रमोद वालेकर, माधवराव पाटील यांच्या शुभहस्ते वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष संजय कदम, सचिव रविंद्र गायकवाड, खजिनदार हरेश साठे, सहसचिव सुधीर पाटील, कायदेशीर सल्लागार अॕड. मनोहर सचदेव, जेष्ठ पत्रकार विवेक पाटील, विशाल सावंत, ओमकार महाडिक, ऋषिकेश थळे, समाजसेवक रविंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष रत्नाकर पाटील म्हणाले की, फणसवाडी आदिवासीवाडीवर जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यामागे एक कारण असे होते, ते म्हणजे, ज्या आदिवासीवाडीला जाण्यासाठी रस्ता नाही, अशा अतीदुर्गम आदिवासीवाडीवर आजवर कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, त्यामुळे मदतीपासून वंचित असलेल्या आदिवासी बांधवांना दिवंगत बाळशास्त्री जांभेकर याची आठवण म्हणून आजच्या उपक्रमाचा खटाटोप असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोरोना काळात या आदिवासी पाड्यावर कोणत्याही माध्यमातून मदतीचा हात पोहचला नसल्याचे आमच्या निदर्शनास आल्याने आजचा आगळावेगळा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे ही त्यांनी आवर्जून सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष केवळ महाडिक यांनी केले. यावेळी जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील यांनी उपस्थितांना बहुमोल मार्गदर्शन केले. अत्यंत स्तुत्य अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमाला फणसवाडी येथील आदिवासी बांधवांनी व महिलांनी मोठी गर्दी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *