सेलिब्रेशन साठी आलेल्या मुलीवर केला बलात्कार….

बलात्कारी नराधमाच्या 12 तासात बांधल्या मुसक्या

सेलिब्रेशन साठी आलेल्या मुलीवर केला होता बलात्कार

पनवेल दि 28 वार्ताहर

     नवी मुंबई खिसमस व न्यु इयर सणा निमित्त मुंबई भ्रमण करण्यास आलेल्या मुली सोबत बलात्कार करणा - या नराधमास पनवेल शहर पोलीसांनी १२ तासात  जेरबंद केले आहे.
      पनवेल शहर पोलीस ठाणे हददीतील कोळीवाडा स्मशानभुमीच्या बाजूच्या सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागे , पनवेल येथील रिक्षाचालक सचिन नावाचे अनोळखी इसमाने फिर्यादी महिलेस दगडाने जीवे ठार मारण्याचा धाक दाखवून तिचे संमतीशिवाय , इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केल्यावरुन गु.र.नं. 1 ४ ९९ / २०२० भादवि कलम ३७६,५०६ ( २ ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदरचा गंभीर स्वरुपाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी मा.पोलीस आयुक्त श्री बीपिन कुमार सिंह , मा . पोलीस सहआयुक्त डॉ.जय जाधव , मा , अपर पोलीस आयुक्त डॉ . बी . जी . शेखर पाटील , मा पोलीस उप आयुक्त श्री शिवराज पाटील व मा . सहा . पोलीस आयुक्त , श्री रविद्र गिड्डे यांनी विशेष प्रयत्न करुन उपकीस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या . सदर गुन्हयातील पीडीत महीला ही जिल्हा जसपुर , राज्य छत्तीसगड येथुन नाताळ व न्यु इयर  साजरा करण्यासाठी आली होती . प्रथम ती झारखंड वरुन दिल्ली येथे आली होती तेथे एक दिवस हॉटेल मध्ये राहुन पश्चिम एक्सप्रेस ने दिनांक २२/१२/२०२० रोजी बांद्रा रेल्वे स्टेशन येथे आली होती . सदर ठिकाणी तिला रेल्वे टीसी यांनी एकटी असल्याचे पाहून चाइल्ड हेल्प लाईनच्या ताब्यात दिले व त्यांनी तिला सखी सेंटर मुलींचे होम मध्ये दाखल केले होते सदर ठिकाणाहुन तिची चौकशी करुन तिला सोडुन देण्यात आले होते . दिनांक २६/१२/२०२० रोजी सदर पिडीत मुलगी ही सकाळी पनवेल रेल्वे स्टेशन येथे आली होती . सदर ठिकाणी शिवा नावाचे इसमाबरोबर तिची ओळख झाली होती व ती त्याचेसोबत राहीली होती . दिनांक २७/१२/२०२० रोजी सदर पिडीत मुलीने पनवेल रेल्वस्टेशन येथुन एका रिक्षाला हात दाखवुन गांधी गार्डन सोडण्यास सांगीतले असता त्याने सदर पिडीत महीलेस सदर ठिकाणी घेवुन न जाता वडघर नदीच्या काठी , स्मशानभुमीच्या बाजूला झाडीमध्ये घेवून जावुन सदर ठिकाणी पडलेला दगड तिचेवर उगारुन तिला जीवे मारण्याचा धाक दाखवून तिचेवर जबरदस्तीने बलात्कार केला . गुन्हयाची उकल : वरिष्ठांनी दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोनि ( गुन्हे ) संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर गुन्हयात गोपनिय बातमीदारामार्फत व तांत्रीक तपास चालु केला होता . सदरची पिडीत मुलगी ही रेल्वस्टेशन परीसरातुन रिक्षात बसली असल्याने तेथील सर्व रिक्षा चालक , झोपडपट्टी , रहीवाशी सोसायटया व व्यवसायीक आस्थापना यांचेकडे सदर आरोपी बाबत चौकशी सुरु केली होती . सदर चौकशी सुरु असता आरोपीतचे ताब्यात असलेले संशयित रिक्षाबाबत गोपनिय माहीती प्राप्त झाली होती . त्यावरुन पुढे तपास सुरु करुन सदर आरोपीतास बारवाई गाव , पोस्टे पोयंजे , ता . पनवेल जि.रायगड येथुन रिक्षासह ताब्यात घेवुन अटक केले आहे . सदर गुन्हयात आरोपीबाबत कोणताही मागमुस नसतांना केवळ " Field Work ' ' द्वारे माहीती प्राप्त करुन १२ तासात सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे . तपास अधिकारी- सपोनि मोनाली चौधरी , अटक आरोपी : १ ) सचिन लालताप्रसाद शर्मा , वय २६ वर्षे , धंदा रिक्षा ड्रायव्हर , रा . बारवाई गांव , पोस्टे पोयंजे , ता . पनवेल जि.रायगड . कारवाई पथक : सदरची कारवाई पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि शिंदे , पोउपनि सुनिल तारमळे , पोहवा / विजय आयरे , पोहवा / वाघमारे , पोशि / राजु खेडकर , पोना / विनोद पाटील पोशि / सुनिल गर्दनमारे , पोशि / यादवराव घुले पोना / पंकज पवार , पोना / परेश म्हात्रे , पोना / गणेश चौधरी व पोशि साळुखे यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *