रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्‍या आस्थापनांविरोधात कारवाई करणार :- परिमंडळ पोलीस उपायुक्त शिवराज पाटील

रात्री उशिरापर्यंत सुरू असणार्‍या आस्थापनांविरोधात कारवाई करणार :-परिमंडळ पोलीस उपायुक्त शिवराज पाटील
पनवेल, दि.28 (संजय कदम) ः शासनाने निर्देश आखून दिले असताना सुद्धा अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हॉटेल, ढाबे, पानटपर्‍या व इतर आस्थापने सुरू असतात. यांच्याविरोधात आता कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.
नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात अनेेकजण तयारी करीत आहेत. काहीजण यासाठी हॉटेल, ढाबे, फार्म हाऊस, सोसायटीचे टेरेस याठिकाणी नियोजन करीत आहेत. अशावेळी मद्यासह गुटखे, अंमली पदार्थ, गांजा आदींचा सर्रास वापर केला जातो. काही ठिकाणी रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करण्याात येते. हे सर्व टाळण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. त्या परिसरात असणारे हॉटेल, ढाबे व इतर आस्थापने यांची माहिती घेण्यात येत आहे. कोणताही अनुचित किंवा गैरप्रकार घडू नये यासाठी सर्वच पोलीस ठाण्याची तयारी सुरू केली आहे. 31 डिसेंबरला महत्वाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोक घराबाहेर पडतात. त्यांनी सुद्धा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वतःवर नियंत्रण ठेवावे, गर्दीचे ठिकाण टाळावे, हॉटेल, पार्ट्या, ढाबे पार्ट्या टाळाव्यात, असे आवाहन परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी केले असून नियमभंग करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्याला दिल्याची माहिती सुद्धा पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे.
फोटो ः शिवराज पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *