कोरोना मुळे येथील हॉटेल्स रेस्टॉरंट बंद असल्याने मुक्या प्राण्यांचचे खूपच हाल होत आहेत
कोरोना मुळे येथील हॉटेल्स रेस्टॉरंट बंद असल्याने मुक्या प्राण्यांचचे खूपच हाल होत आहेत.यामध्ये मुख्यतः माकडे, मोकाट कुत्रे आणि गायांच्या खाद्यासाठी वनखात्याने काहीतरी उपाययोजना करावी जेणेकरून या प्राण्यांचा भूकबळी मुळे मृत्यू होणार नाही.
एकीकडे कोरोनामुळे सर्व व्यवहार पूर्णत: बंद करण्यात आल्यामुळे माथेरान वर प्रेम असलेल्या विविध संस्थाच्या माध्यमातून तसेच गावातील नेहमीच्या ठराविक दानशूर व्यक्तींमार्फत गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. तर इथे घोड्यांचे खाद्य( भुसा) उपलब्ध नसल्याने त्यांनाही दोन ते तीन वेळा हे खाद्य पुरविण्यात आले आहे. त्यामुळे घोडेवाल्याना पुढील काही दिवस तरी पशु खाद्याची चणचण भासणार नाही.
परंतु इथले मुख्य आकर्षण असलेला आणि आपल्या मर्कटलीलेने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या माकडांच्या खाद्यासाठी आजवर कुणीही पुढाकार घेतलेला दिसत नाही.कोरोना मुळे सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट लहान मोठे स्टोल्स बंद आहेत.त्यामुळेच ही माकडे आजही उपाशीपोटी आपल्या लहान लहान पिल्लाना पोटाशी धरून वणवण भटकताना दिसत आहेत.
त्याचप्रमाणें मोकाट कुत्री, गाया सुध्दा अन्नाच्या शोधात तडफडत आहेत.तर काही भागात या माकडांना कुत्र्यांनी खाद्यासाठीआपले भक्ष्य बनविले असून त्यांना जखमी करून खाल्ले आहे.असेही प्रकार घडत आहेत. गावातील नागरिकांनी निदान मुक्या प्राण्यांच्या खाद्याची सोय करू शकले नाहीत तर निदान पुढील काही दिवस तरी घराच्या दारासमोर एखादया भांड्यात पिण्याचे पाणी ठेवल्यास या मुक्या प्राण्यांना जगण्यासाठी आधार मिळू शकेल.