मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी स्ट्रीट लाईट चा विषय लावला मार्गी
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी स्ट्रीट लाईट चा विषय लावला मार्गी.
माझा प्रभाग,माझी जवाबदारी.या अनुषंगाने काम करणारे नगरसेवक विक्रांत पाटील नेहमीच आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर असतात.नागरिकांच्या समस्यांचे निवारण लवकरात लवकर व्हावे आणि नागरिकांना समाधान मिळावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.प्रभागातील स्वामी नित्यानंद मार्गावरील स्वप्न,राजहंस सोसायटींना जाणाऱ्या रस्त्यावरील दिवे बंद असल्या कारणांने अंधार होत असल्याची तक्रार नागरीकांनी केली होती.महापालिका अधिकाऱ्यांशी बोलून त्वरित नवीन दिवे लावून घेण्यात आले.प्रभागातील समस्या नगरसेवक विक्रांत पाटील हे त्वरित सोडवतात या बद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले.