पनवेल ची शासकीय आरटीपीसीआर अलिबागला 60 किमी आंतरावर; नगरसेवक राजेंद्र शर्मा यांची आरोग्य मंत्र्याकडे महत्वपूर्ण मागणी

पनवेल ची शासकीय आरटीपीसीआर अलिबागला 60 किमी आंतरावर; नगरसेवक राजेंद्र शर्मा यांची आरोग्य मंत्र्याकडे महत्वपूर्ण मागणी...पनवेल दि. 27 (वार्ताहर):रायगड जिल्ह्यात एकमेव महापालिका असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण गेल्या दहा महिन्यापासून आढळत आहेत. कोरोना विषाणू ची साखळी तोडण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून पनवेल परिसरात कोणत्याही सुविधा निर्माण करण्यात आलेल्या नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे येथून शासकीय आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी थेट अलिबागला नमुने पाठवण्यात येणार आहेत. त्यासाठी ६०  किलोमीटर प्रवास करावा लागणार आहे. महाराष्ट्र शासनाचा हा तुघलकी कारभार असल्याने सर्वसामान्य पनवेल करांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे ताशेरे भाजप नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी ओढले  आहेत. पनवेल साठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करण्याची मागणी त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.           मार्च महिन्यापासून कोरोना ची लाट संपूर्ण भारत देशामध्ये पसरलेली आहे. विशेषता भारताच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाविषाणूचे मोठ्या प्रमाणात संक्रमण झाले. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळून आले. मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या महानगरांमध्ये ही ही स्थिती होती. आजही या भागात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. विशेषता मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेलचा विचार करता. ही कॉस्मोपॉलिटन सिटी म्हणून ओळखली जाते. या परिसरात स्थलांतरित लोकवस्ती हि मोठ्या प्रमाणात आहे. बाहेरील देश आणि परराज्यातील येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय घाटमाथा आणि कोकणातून अनेक जण  येथे स्थायिक झालेले आहेत. एकंदरीतच पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरम्यान कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही महिन्यांमध्ये आढळून आलेली आहे. पनवेल मध्ये सर्वात अगोदर जिल्हा कोविड हॉस्पिटल पनवेल ग्रामीण रुग्णालयात  सुरू करण्यात आले होते. त्यानंतर एमजीएम हॉस्पिटललाही  तो दर्जा देण्यात आला. खाजगी कोविड हॉस्पिटल सुद्धा सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली. एकंदरितच पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण पनवेल येथे मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला होता. आजही या भागात कोरोना रुग्ण आढळून येतात. त्यापैकी अनेक जण आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्याने त्यांच्या खिशाला खाजगी प्रयोगशाळेत कोरोना चाचणी परवडणारी नाही. त्यामुळे अनेक जण यापासून वंचित राहतात. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अॅटीजनची चाचणी  करण्याची सोय सुरू असली तरी आरपीसीआर ही चाचणी अंतिम आणि महत्त्वाची असते. दरम्यान पनवेल ला एकही शासकीय प्रयोगशाळा नाही. त्यामुळे खाजगी लॅबमध्ये पैसे देऊन चाचण्या कराव्या लागतात. झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या रहिवाशी त्याचबरोबर चाळीतील भाडेकरी याव्यतिरिक्त गोरगरिबांना खाजगी प्रयोगशाळेतील तपासण्या परवडणाऱ्या नाहीत. दरम्यान पनवेल ला मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या असताना राज्य सरकारने अलिबाग येथे प्रयोगशाळा सुरू केली आहे.  त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नमुने थेट आलिबाग या ठिकाणी घेऊन जावे लागत आहेत. त्यासाठी खास वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे. रस्ते ठीक नसल्याने नमुने पोचण्यासाठी विलंब होत आहे. त्याचा परिणाम रुग्णांच्या उपचारावर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चौकटप्राथमिक आरोग्य केंद्रात नमुने जमा करणारपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नमुने जमा करून ते क्रमांक तीनच्या केंद्रामध्ये एकत्रित करण्यात येणार आहेत. तेथून महापालिकेच्या गाडीने जमा केलेले नमुने आरटीपीसीआर चाचण्यांसाठी पाठवले जाणार आहेत.60 किमी अंतर कापून नमुने सामान्य जिल्हा रुग्णालयात पोचवावे लागणार आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात विलंब लागणार असल्याने अहवाल येणार कधी असा प्रश्न भाजप नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी उपस्थित केला आहे.
चौकटपनवेल परिसरासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा सुरु करापनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण पनवेल करिता स्वतंत्र प्रयोगशाळा राज्य सरकारने सुरू करावी अशी महत्त्वपूर्ण मागणी  राजेंद्र शर्मा यांनी केली आहे. यासंदर्भात आपण आरोग्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडित पाठवला सुरू राहील असेही ते म्हणाले.
कोटपनवेल महानगरपालिकेकडे राज्य सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक अस्वस्थ असताना त्याचबरोबर कोरोना ने थैमान घातलेले असताना येथील मूलभूत सुविधांसाठी राज्य सरकार कडून पाठ दाखवण्यात आली आहे. प्रयोगशाळा हा सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रासाठी चाचण्या करण्याच्या उद्देशाने स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू करावी अशी स्थानिक नगरसेवक म्हणून आमची न्याय मागणी आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी नक्कीच पाठपुरावा केला जाईलराजेंद्र शर्मानगरसेवक पनवेल महापालिका
           फोटोःनगरसेवकराजेंद्र शर्मा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *