दि फूड कंपनी या दुकानाचे उदघाटन प्रमुख अतिथी परेश ठाकूर यांच्या हस्ते …

दर्जेदार उत्पादने हे या दुकानाचे वैशिष्टयः परेश ठाकूर
दि फूड कंपनी या दुकानाचे उदघाटन…

पनवेल/प्रतिनिधी
पनवेलमधील दोन तरुणांनी मिळून सुरु केलेल्या दि फूड कंपनी या दुकानाचे उदघाटन करताना मला अत्यानंद होत आहे. दर्जेदार उत्पादने हे या दुकानाचे वैशिष्ट असून या दुकानाचे भागीदार अनिकेत सावंत व विक्रांत रामधरणे हेही दर्जेदार कुटूंबातील आहेत असे गौरवोद्गार पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी काढले. पनवेलमधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दि फूड कंपनी या दूकानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, उत्पादने दर्जेदार असतील तर व्यवसाय करणे सोपे होते. कारण दर्जेदार उत्पादनांना ग्राहक पसंती देतात आणि हे दुकान ग्राहकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल यात शंका नसल्याचे सांगत तरुणांना व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नगरसेविका रुचिता लोंढे,नगरसेविका दर्शना भोईर नगरसेवक राजू सोनी, नगरसेवक अजय बहिरा, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पवन सोनी, तालुका पत्रकार संघ समितीचे अध्यक्ष रत्नाकर पाटील, सल्लागार दिपक महाडिक, उपाध्यक्ष केवल महाडीक, रवींद्र गायकवाड, संजय कदम, अकबर सय्यद, अरविंद पोतदार, विशाल सावंत, संतोष सुतार, ओमकार महाडिक तसेच सावंत रामधरणे यांचे कुटूंबिय मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *