माथेरान घाटात गाडीने घेतला पेट…
दुपारच्या तीन वाजण्याच्या सुमारास नेरळ माथेरान घाटरस्त्यावर MH46BY1433 या गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे काहीवेळ वाहतूक व्यवस्था मंदावली होती. या गाडीचा एसी सुरू असताना घाटात इंजिन गरम झाल्यामुळे गाडीने पेट घेतल्याचे बोलले जात आहे. तर या आगीचे लोट दूरवर गेल्याने या डोंगर भागातील गवताने सुध्दा पेट घेतला आणि त्या ठिकाणी वनव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. सुदैवाने या आगीत काही जीवितहानी झाली नाही प्रसंगावधान राखून चालक बाहेर पडला. पोलीस कर्मचारी तसेच टॅक्सी चालक ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले परंतु आग एवढी तीव्र होती की या आगीत गाडी पूर्णता जळून खाक झाली आहे याबाबत नेरळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.