अगोदर लग्न ठरलेले ही गोष्ट लपवून महिलेविरूद्ध शरीर संबंध ठेवणाऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल..

अगोदर लग्न ठरलेले ही गोष्ट लपवून महिलेविरूद्ध शरीर संबंध ठेवणाऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल…
पनवेल, दि.24 (वार्ताहर)- अगोदरलग्न ठरलेले ही गोष्ट लपवून महिलेविरूद्ध शरीर संबंध ठेवणाऱ्या विरूद्ध गुन्हा पनवेल शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.         करंजाडे येथे राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेस आरोपी मोबिन मनझूर हुसेन डुंगा (वय-28, रा.-भिवंडी) याने सन 2018 पासून इन्स्टाग्राम या एपवरून सदर महिलेसोबत ओळख वाढवून मैत्री करून विश्वास संपादन केला. तिच्यासमोर प्रेमसंबंध ठेवून मग लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरूद्ध शारिरिक संबंध प्रस्थापित करून स्वतःचे अगोदर लग्न ठरले ही गोष्ट तिच्यापासून लपवून ठेवून तिच्या शरीरास मनास लौकिकास नुकसान पोहचिवले म्हणून सदर इसमाविरूद्ध भांदवि कलम 376, 417 अन्वये पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून सपोनि निशांत धनवडे अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *