रक्तदानाच्या रूपाने शरद पवारांना वाढदिवसाची अनोखी भेट…

रक्तदानाच्या रूपाने शरद पवारांना वाढदिवसाची अनोखी भेट
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पुढाकार
मेहबूब शेख यांच्या वाढदिवसानिमित्त ही सामाजिक उपक्रम
कळंबोली येथील शामल मोहन पाटील शैक्षणिक संकुलात रक्तदान शिबिर संपन्न
पनवेल /प्रतिनिधी:- राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. त्यातच महाविद्यालय तर बंद आहेतच त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रम घेतले जात नाहीत. या सर्व गोष्टींमुळे रक्ताची कमतरता भासत आहे. त्यामुळे रुग्णांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्रात जास्तीत जास्त रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलित करावे अशा प्रकारचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना केले होते. त्यानुसार पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शनिवारी कळंबोली येथील शामल मोहन पाटील शैक्षणिक संकुलात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी याकरीता उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 मार्च महिन्यापासून कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. सध्या कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी. हे संकट आजही कायम आहे. यासाठी मध्यंतरी टाळेबंदी सुद्धा घेण्यात आली होती. महाविद्यालयांना सुट्टी असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करता आले नाहीत. त्याचबरोबर कोरोनाविषाणू चे संक्रमण होऊ नये यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येत नाही. परिणामी वाढदिवस आणि इतर कार्यक्रम साजरे झाले नाहीत. यामुळे रक्तदान शिबिर आयोजित करता आलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासू लागला आहे. नॉन कोविड रुग्णांना रक्ताची गरज भासत आहे. रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया करण्यासाठीही रक्त आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे काही सामाजिक संस्था रक्तदानासाठी पुढाकार घेत आहेत. तरीही रक्ताची निकड बसू लागले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रात पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन ही गरज पूर्ण करावी असी विनंती त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्राद्वारे केले होते. आरोग्य मंत्री टोपे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः रक्तदान करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक प्रकारे आवाहन केले होते. त्यानुसार पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा केला.

या रक्तदानशिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, प्रशांत पाटील , पनवेल शहर जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील, कार्याध्यक्ष डॉ. शिवदास कांबळे, उपाध्यक्ष प्राचार्य बी.ए पाटील राष्ट्रवादी काँग्रेस युवक पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष प्रमोद बागल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून रक्तदान करण्यात आले.
पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष अजिनाथ सावंत,पनवेल शहर युवक जिल्हा कार्यध्यक्ष शहबाज़ पटेल,खारघर अध्यक्ष बळीराम नेटके, पनवेल शहर युवक जिल्हा सरचिटणीस रणजीत नरुटे,खारघर महिला अध्यक्षा , राजश्री कदम,महिला उपाध्यक्ष विद्याताई सकटे,स्नेहा पाटील, स्नेहल शेवाले,खारघर शहर उपाध्यक्ष योगेश निपाने,निखिल कोईघाड़ी, मनोहर सत्रे,अतुल , कुंडलीक नेटके पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष सन्नी जामदार , सागर मोरे, विनोद सुपे , सुनील खताळ,प्रशांत देशमुखे, अजय इंगवले,अवधूत साळुंखे, सुरज पवार,अक्षय पाटील,युवा नेता तुषार पाटील,पनवेल शहर जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष विजय मयेकर,खारघर शहर ओबीसी सेल अध्यक्ष नरेश पाटील,खारघर ओबीसी सेल सरचिटणीस तुकाराम भगत,अक्षय पाटील, कामोठे शहर अध्यक्ष चंद्रकांत नवले,पनवेल शहर सहसचिव बबनराव पवार,, राहूल यमगर्णी, शैलेश लोंढे
, सचिन देवकते, विक्रम नरुटे, मोहन सोलंकर, किरण मोठे, अजित पडळकर ,किरण जाधव, शुभम गोडसे ,अजित मोठे, पनवेल शहर जिल्हा सचिव अमित पडवळ उपस्थित होते.

कोट

पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने १३ डिसेंबर २०२० रोजी कळंबोलीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील रूग्ण, रूग्णालयांची रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदानाचे शिबीर आयोजित करून रक्त संकलन करण्यात आले. कोरोना रुग्णांना रक्ताची गरज पडत नाही परंतु राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसैमिया व अन्य रूग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, व नागरिकांनी पुढे यावे स्वत: रक्तदान करावे, इतरांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करावे व रक्त संकलनाच्या कार्यास हातभार लावावा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि युवक चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. त्यासाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *