भाजपा मधील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

भाजपा मधील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली बांधले शिवबंधन

पनवेल दिनांक 14 (वार्ताहर)

शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून खांदा वसाहतीमधील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत शिवबंधन हाती बांधले आहे.
खांदा वसाहत शहर प्रमुख सदानंद शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्गाचा समावेश होता. जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेल परिसरात शिवसेनेचा झंझावात जोरदारपणे सुरू असून हजारो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत.
शिवसेना हा जनमानसातील तळागाळातल्या प्रत्येक घटकास सोबत राहात समाजकारण करणारा पक्ष असून केवळ आणि केवळ शिवसेनाच सामान्य माणसाला न्याय देऊ शकते म्हणूनच आज आम्ही भारतीय जनता पार्टीला रामराम करत हातामध्ये शिवबंधन बांधले आहे! अशी खणखणीत प्रतिक्रिया प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *