तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या जवानाचा गुदमरून मृत्यू..

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये कारखान्याला आग; अग्निशमन दलाच्या जवानाचा गुदमरून मृत्यू..
पनवेल, दि. 5 (वार्ताहर) ः तळोजा औद्योगिक वसाहती मधील एका कारखान्याला भिषण आग लागली. या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून आणखी काही जवानांना श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याची माहिती मिळत आहे. बाळू देशमुख असं मृत जवानाचे नाव आहे.
औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे 39 वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणार्‍या कारखान्याला रात्री 12 च्या सुमारास ही आग लागली असून घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मृत झालेला अग्निशमन दलाचा जवान अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकात कार्यरत असल्याची माहिती मिळत असून, जखमी जवानांना नजदिकच्या एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांत गुदमरू हा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले असून, श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने इतर जवानांना एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तळोजा औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाचे प्रमुख दीपक दोरुगडे यांचा देखील समावेश आहे.
फोटो ः कारखान्याला लागलेली आग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *