शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मासे विक्रेते करणार्‍या विक्रेत्यांचा जागेचा प्रश्‍न सुटला..

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मासे विक्रेते करणार्‍या विक्रेत्यांचा जागेचा प्रश्‍न सुटला..
पनवेल, दि. 5 (वार्ताहर) ः नवीन पनवेल परिसरात मासे विक्री करणार्‍या विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्‍न शिवसेना व महिला आघाडीच्या पाठपुराव्यामुळे सुटला आहे.
नवीन पनवेल आदई सर्कल येथे स्थानिक व आसपासचे भूमिपुत्र मासळी विकुन आपला चरितार्थ चालवतात. सद्य स्थितीत करोना साथी रोगा मूळे लोक बेजार व बेकार झाले असताना मासळी विक्री करून आपले व कुटुंबातील सदस्यांचे उदारनिर्वाहन करणार्‍या ह्या लोकांना महापालिका फेरीवाला प्रतिबंधक पथकाच्या कारवाई मूळे अतिशय त्रास होत असे. याबाबत नवीन पनवेल महिला शहर संघटिका श्रीमती अपूर्वा प्रभु व नवीन पनवेल विभाग प्रमुख किरण सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सदर मासळी विक्रेत्यांनी आपल्या मागण्या साठी पनवेल महानगर पालिकेवर मोर्चा नेला. या प्रसंगी गुरुनाथ पाटील शिवसेना उपमहानगर संघटक पनवेल यांचे मोलाचे मार्गदर्शन व नेतृत्व लाभले. स्थानिक मासळी विक्रेत्यांचा प्रश्‍न तात्पुरता सोडवण्यात यश मिळाले व स्थानिक मराठी मासळी विक्रेत्यांना विक्री साठी हक्काची जागा उपलब्ध होण्यासाठी उपाययोजनांची सुरवात करण्यात आली त्या प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी उपमहानगर संघटक गुरुनाथ पाटील, गुप्ता, नवीन पनवेल महिला शहर संघटिका अपूर्वा प्रभू, नविन पनवेल विभाग प्रमुख किरण सोनवणे, उप विभाग प्रमुख राजेश वायंगणकर, विकास कोळी, निकिता कोळी व इतर शिवसैनिक तसेच स्थानिक मासळी विक्रेते उपस्थित होते.
फोटो ः मासळी विक्रेत्यांच्या मागणीसाठी शिवसेनेची पनवेल महानगरपालिकेवर धडक मारताना अपूर्वा प्रभू, गुरुनाथ पाटील, किरण सोनवणे व इतर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *