अवैध बनावट भेसळयुक्त विदेशी मद्यसाठ्यासह 2 आरोपींना राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 ने केली अटक…
अवैध बनावट भेसळयुक्त विदेशी मद्यसाठ्यासह 2 आरोपींना राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 ने केली अटक
पनवेल, दि. 5 (वार्ताहर) ः अवैध बनावट भेसळयुक्त विदेशी मद्यासाठ्यातील 2 आरोपींना राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.2 ने अटक केली आहे. दरम्यान एक आरोपी फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहे.
अवैध बनावट भेसळयुक्त विदेशी मद्यसाठा व एक सेलेरिओ कार जप्त निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र 2, पनवेल यांना खात्रीलायक व गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाल्याने त्यांनी साई गावाच्या हद्दीत बनावट भेसळयुक्त विदेशी मद्याच्या वाहतुकीवर पाळत ठेवून छापा घातला असता एक पांढर्या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची सेलेरिओ कार क्रमांक एम एच 46 बीई 6117 नंबर मधून बनावट भेसळयुक्त 484750 मि.ली. क्षमतेच्या बनावट भेसळयुक्त विदेशी मद्याच्या सिलबंद बाटल्या अवैधरित्या वाहतुक करीत असताना आढळल्याने सदर गाडी ताब्यात घेवून गाडीची तपासणी केली. त्या गाडीत आरोपी प्रितम घरत वय वर्षे 28, व अंगद ठाकूर वय वर्षे 35, यांना अटक करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हयात वापरण्यात आलेला एक अॅपल कंपनीचा मोबाईल व सेलेरिओ कारसह असा एकूण रुपये 5,52,655 / -किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच सदर गुन्हयात संजीवन पाटील हा भेसळयुक्त मद्य पुरवठा करणारा संशयीत इसम फरार असून त्याचा शोध चालु आहे. सदर कारवाई कांतीलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, श्रीमती. उषा राजेंद्र वर्मा संचालक (अंमल बंजावणी व दक्षता) राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, सुनिल चव्हाण विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे, श्रीमती.किर्ती शेडगे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड-अलिबाग, विश्वजीत देशमुख उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड – अलिबाग, यांचे मार्गदर्शनाखाली एस.एस.गोगावले (निरीक्षक), अविनाश रणपिसे (निरीक्षक), आनंद पवार (निरीक्षक), एस.एस.गायकवाड (दुय्यम निरीक्षक), गोविंद पाटील (दुय्यम निरीक्षक), माजगांवकर (दुय्यम निरीक्षक), तसेच पालवे, सुधीर मोरे, श्रीमती.मायाक्का मोरे, संदीप पाटील, कदम (जवान – नि – वा .चालक ) यांनी भाग घेतला. तसेच सोबत मनोज अनंत भोईर व अनंत दत्तु जगदाडे यांनी मदत केली. सदरील गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती.किर्ती शेडगे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे मार्गदर्शनाखाली एस.एस.गायकवाड दुय्यम निरीक्षक हे करत आहेत.
कोट
आगामी ख्रिस्मस (नाताळ) 31 डिसेंबर सणाच्या पार्श्वभूमीवर रायगड – अलिबाग जिल्हयाच्या राज्यातून येणार्या प्रमुख महामार्गावर बनावट विदेशी मद्य निर्मिती, परराज्यातील मद्य, अवैध हातभट्टी निर्मिती, विकी व वाहतुक तसेच धाबे कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. ः एस.एस.गोगावले, निरीक्षक
फोटो ः दोन आरोपी व मद्यसाठ्यासह पोलीस पथक