कोविड काळात खांदेश्‍वर पोलिसांनी केले रक्तदान…रक्तदान श्रेष्ठदान…

कोविड काळात खांदेश्‍वर पोलिसांनी केले रक्तदान ; वपोनि देविदास सोनवणे यांचे  सह कुटुंब रक्तदान
पनवेल, दि.4 (वार्ताहर) ः कोविड काळात रक्ताचा तुटवडा सर्वत्र भासत आहे ,वेळेत रक्त न मिळाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत असल्याने खांदेश्‍वर  पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ न्यू पनवेल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित स्व .डॉ . बी यु लिमये ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरामध्ये  खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी रक्तदान केले
रक्तदान श्रेष्ठदान मानले जाते ,रक्त न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो ,सध्या जागतिक कोविड महामारी मध्ये अनेक रुग्णांना रक्ताची कमतरता भासत आहे अनेक ब्लड बँक मध्ये रक्त साठा कमी झाला आहे . या परिस्थितीत रक्ताची कमतरता भासू नये आपला हि सामाजिक कार्यात खारीचा वाटा असावा या भावनेने वपोनि देविदास सोनवणे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून स्वतः कुटुंबासह रक्तदान करून अधिकारी व कर्मचार्‍यांना रक्तदान करण्यास प्रोत्साहित केले .देविदास सोनवणे यांच्याकडून प्रेरणा घेत दिवसभरात खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या बहुतांश अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी रक्तदान केले .  या रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी रोटेरिअन प्रफुल धारगळकर ,पी.राजीवन ,शरद जटायू ,महेश दळवी ,कमलेश धारगळकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *