वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणायचे तहानेलेल्याला पाणी देणे, भुकेल्याला अन्न देणे हाच धर्म !!

माथेरान सारख्या दुर्गम भागात निस्वार्थपणे समाजसेवा करणे आणि त्यातूनही स्वखर्चाने कुठल्याही प्रकारची अभिलाषा न बाळगता जनहितार्थ अखंडपणे सेवा व्रत अंगिकारल्याने माथेरान शिवसेना शहर प्रमुख तथा मीरा फाउंडेशनचे संस्थापक चंद्रकांत चौधरी यांच्या अविरतपणे गोरगरिबांची यथेच्छ सेवा करीत असल्याबद्दल खासदार अरविंद सावंत,कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यतत्पर आमदार महेंद्र थोरवे यांनी सुध्दा फोन द्वारे शुभेच्छा देऊन कौतुक केले आहे.

कोरोनाच्या या महाभयंकर आक्रमणात आपण सारे शिवसैनिक अडल्या नडलेल्या गोर गरिबांना हिंदू मुसलमान ख्रिस्त इसाई हे भेदभाव न करता मानवतेचा दृष्टिकोन ठेवून सतत मदत करत आहात.
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब म्हणायचे तहानेलेल्याला पाणी देणे, भुकेल्याला अन्न देणे हाच धर्म !!
शिवसैनिक या विचार आणि संस्कारानुसार कार्य करीत आहेत.

वंदनीय शिवसेनाप्रमुखांचे या सर्व शिवसैनिकांना भरभरून आशीर्वाद मिळतील आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आज कोरोनाच्या या भयानक युद्धात अतिशय समर्थपणे आणि यशस्वीपणे नेतृत्व करीत आहेत, त्याचे कौतुक विरोधक आणि भले भले खडूस समीक्षक करीत आहेत, त्यांना ही आपण शिवसैनिक जीवाची पर्वा न करता साथ देत आहात याचा अभिमान वाटतोय. माथेरान या दुर्गम भागामध्ये आपल्या माध्यमातून सत्कार्य करीत आहात त्यासाठी आई भवानी आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो जेणेकरून आपल्या हातून ही जनसेवा अखंड सुरु रहो ही प्रार्थना. असे खासदार अरविंद सावंत यांनी कौतुक करताना आपल्या शुभेच्छा पत्रात नमूद केले आहे. तर आमदार महेंद्र थोरवे यांनी सुध्दा फोन करून चंद्रकांत चौधरी यांनी सुरू केलेल्या अप्रतिम कार्याबद्दल समस्त शिवसैनिकांना सुध्दा शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *