दोन दशकानंतर प्रसाद सावंत यांच्या रूपाने माथेरानच्या विकासाला चालना :आमदार महेंद्रशेठ थोरवे
दोन दशकानंतर प्रसाद सावंत यांच्या रूपाने माथेरानच्या विकासाला चालना : आमदार महेंद्रशेठ थोरवे
माथेरानच्या रुपाला साजेसा आणि या गावातील नागरिकांना तसेच येणाऱ्या पर्यटकांना अभिप्रेत असणारी विकास कामे त्याचबरोबर पर्यटन वाढीसाठी, इथे खऱ्या अर्थाने पर्यटन क्रांती घडवून आणण्यासाठी सद्यपरिस्थितीत जी काही महत्वपूर्ण विकास कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.मागील वीस वर्षात कुणालाही जमले नाही ती सर्व महत्वपूर्ण कामे पुढील एक वर्षात पूर्ण होणार आहेत.त्यामध्ये मोलाचा वाटा हा नवोदित राजकीय पटलावर आपले अग्रस्थान अबाधित ठेवण्यात यशस्वी होत असलेले आमचे परममित्र नगरपरिषदेचे गटनेते, बांधकाम सभापती तथा शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद सावंत यांच्या रूपाने लाभलेले आहे याचा खूप आनंद होत असून आगामी काळात सुद्धा पक्षाच्या माध्यमातून पुढील सत्तेच्या काळात अनेक महत्वाकांक्षी आणि पर्यटनाला गती प्राप्त करून देणारी कामे पूर्ण होतील प्रसाद सावंत यांनी या गावाच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपली कंबर कसली असून नक्कीच ते आपल्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नागरिकांचा विश्वास संपादन करून प्रलंबित कामे मार्गी लागतील यात शंकाच नाही असे मत कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यासम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केले.
येथील विविध विकास कामाच्या उदघाटन थोरवे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी आवर्जून प्रसादभाई सावंत जनसंपर्क कार्यालयास भेट दिली त्याप्रसंगी ते समस्त कार्यकर्त्यांना संबोधित करून बोलत होते. यावेळी माजी शिक्षण समिती सभापती , नगरसेवक नरेश काळे,माजी बांधकाम सभापती शकील पटेल,राजेंद्र शिंदे, शिक्षण समिती सभापती संदिप कदम यांसह नगरसेवक, नगरसेविका आणि अन्य कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रसाद सावंत यांनी इथल्या विकास कामांवर लक्ष केंद्रित केले आहेच शिवाय युवा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी त्याचप्रमाणे तरुण वर्ग स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी बँकेकडून दहा हजार रुपयांचे कर्ज प्राप्त करून दिले आहे त्यामुळे अनेकांना छोटा व्यवसाय करण्यासाठी हातभार लागला आहे. सर्वसामान्य लोकांची मुले प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असून एक वर्ग ( व्हर्चुअल क्लास रूम ) करण्यासाठी, त्याचे नूतनीकरण करण्यासाठी स्वखर्चाने प्रसाद सावंत हे पुढाकार घेत आहेत त्यामुळे आम्ही सुध्दा याच प्राथमिक शाळेतील एक वर्ग अशाचप्रकारे बनवून देऊ अशी ग्वाही आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी यावेळी दिली आहे.
तर या शाळेतील अपुऱ्या शिक्षकांच्या संख्येमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या काही त्रास होऊ नये यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत या वरीष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.लवकरच या समस्याचे सुध्दा निराकरण होणार आहे.तसेच नगरपरिषदेच्या अखत्यारीत असलेल्या या शाळेच्या खोल्यांमध्ये गव्हाणकर ट्रस्टचे काही वर्ग सुध्दा भरले जातात अनेकदा काही कारणास्तव या शाळेतील कामकाजात विघ्न येत असतात यासाठी पहिली ते दहावी पर्यंत सर्व वर्ग नगरपरिषदे मार्फत सुरू व्हावेत यासाठी नगरपरिषदेने शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे.आगामी काळात सर्व वर्ग हे नगरपरिषदेमार्फत सुरू होण्याची शक्यता आहे.असे गटनेते प्रसाद सावंत यांनी स्पष्ट केले.
डिजिटल शाळा, समृद्ध शाळा आणि शाळा सिद्धी साठी लागणारे सर्व निकष नगरपरिषदेने पूर्ण केले असून त्यासाठी आवश्यक असणारे स्वतंत्र किचन शेड, प्रयोग शाळा, संगणक कक्ष,ई टॉयलेट सुविधा आणि शाळेला सुरक्षा कवच असावे या हेतूने संरक्षण भिंती देखील उभारल्या गेल्या आहेत हे सर्व निकष सद्यस्थितीत पूर्ण केले आहेत. असे माजी शिक्षण सभापती नरेश काळे यांनी सांगितले.