स्थायी समिती सभापतींची दर्जात्मक छाप विकास कामांचा दर्जावर विशेष लक्ष देणार संतोष शेट्टी यांनी प्रशासनाला केली सुचित..

स्थायी समिती सभापतींची दर्जात्मक छाप
विकास कामांचा दर्जावर विशेष लक्ष देणार
संतोष शेट्टी यांनी प्रशासनाला केली सुचित..

पनवेल, दि.29 (वार्ताहर)- ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यावर स्थायी समिती सभापती पदाची जबाबदारी नुकतीच सोपवण्यात आलेली आहे. पदभार घेतल्यानंतर शेट्टी यांनी आपल्या कामाची छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. मनपा क्षेत्रात यापुढे जी विकास कामे होतील ते दर्जेदार असायला हवेत. आपण स्वतः त्याची पाहणी करू अशा शब्दात स्थायी समिती सभापतींनी प्रशासनाला सूचित केले.
2006 सालापासून संतोष शेट्टी नगरसेवक म्हणून काम करत आहेत. ही त्यांची तिसरी टर्म असून ते ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळखले जातात. नवीन पनवेल मध्ये मोठा प्रभाव त्यांनी गेल्या बारा-तेरा वर्षांमध्ये निर्माण केला आहे. डोअर टू डोअर जनसंपर्क असलेले संतोष शेट्टी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. मूलभूत सुविधांपासून विकास कामे व्हावे त्यासाठी त्यांनी सिडकोशी एक दशकांपेक्षा जास्त काळ संघर्ष केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी अमरण उपोषण सुद्धा केले. सर्वसामान्यांचे हित साधणारा नगरसेवक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे. पनवेल नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. त्यांच्या गाठीशी लोकप्रतिनिधी म्हणून मोठा अनुभव आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजोपयोगी उपक्रम ते राबवत आले आहेत. जनतेशी नाळ जोडलेल्या शेट्टी यांना पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापतीपद देऊन त्यांच्या निष्ठेचा आणि प्रामाणिकपणाचा गौरव आ.ठाकूर यांनी केला आहे. त्यांच्या रूपाने बिगर मराठी भाषिक नगरसेवकाचे पनवेलच्या राजकारणात महत्त्व अधोरेखित झाले. दरम्यान सभापतिपदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर पनवेल मनपा क्षेत्रात यापुढे जे विकास कामे होतील. त्याचा दर्जा उत्तम असला पाहिजे अशाप्रकारचा व्होरा स्थायी समिती सभापतींनी लावला आहे. पहिल्या बैठकीत त्यांनी दर्जात्मक विकास कामांवर जोर दिला. त्याचबरोबर पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे अप्रत्यक्षरीत्या त्यांनी प्रशासनाला सांगितले. पनवेल परिसरात यापुढे जो विकास होईल तो अत्यंत दर्जात्मक असला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महापौर डॉ कविता चौतमोल, उपमहापौर जगदीश गायकवाड, नगरसेवक हरेष केणी यांनी तळोजा परिसरातील विकास कामांची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *