कोकण आयुक्तांनी दिले चौकशी करून कारवाईचे करण्याचे आदेश.

चिरले ग्रामपंचायतच्या गैर कारभाराची आयुक्ता कडून दखल.

कोकण आयुक्तांनी दिले चौकशी करून कारवाईचे करण्याचे आदेश.

उरण दि 25(वार्ताहर )
चिरले ग्रामपंचायतीचे शेकाप काँग्रेस युतीचे सरपंच प्रियांका दीपक मढवी माजी उपसरपंच निवृत्ती धनाजी पाटील व ग्रामसेविका आसावरी रंजीत कदम यांना पदावरून पायउतार करण्यासाठी तक्रारीवरून मा.विभागीय आयुक्त कोकण विभाग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांना दिले चौकशीचे आदेश दिले आहेत.

चिरले ग्रामपंचायतीचे शेकाप काँग्रेस युतीचे सरपंच प्रियांका दीपक मढवी माजी उपसरपंच निवृत्ती धनाजी पाटील व ग्रामसेविका आसावरी रंजीत कदम यांनी आपापसात संगनमत करून पैशाच्या हव्यासापोटी जांभूळपाडा आदिवासी वाडी समाज मंदिर व शौचालय दुरुस्ती ह्या विकासाच्या नावाखाली पैशाची अफरातफर केली. वरील सरपंच, सदस्य यांनी ऑक्टोंबर 2017 रोजी ग्रामपंचायतीचा पदाधिकार स्वीकारून ते आज पर्यंत काम पाहत आहेत. त्यांच्या कर्यकलामद्ये सदरहू ग्रामपंचायतीस 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत निधी मंजूर झाला होता. त्याअनुषंगाने ग्रामपंचायत चिरले यांनी खालीलप्रमाणे विकास कामांच्या नावाखाली निधी मंजूर करून शासनाच्या पैशाची पुढीलप्रमाणे अफरातपर केली. जांभुळपाडा आदिवासीवाडी समाज मंदिर दुरुस्त करणे करता व शौचालय दुरुस्ती करणेकरीता अनुक्रमे सन 2016 – 17 , 2017-18 ह्या दोन वर्षांकरिता आणि सन 2017 – 18 , 2018-19 ह्या दोन वर्षांकरिता दिनांक. 25/06/2019 रोजी ग्रामपंचायत चिरले यांनी अनुक्रमे ठराव नंबर. 44/28, 44/30, 44/29, 44/31. प्रमाणे मंजूर केला आणि त्याच दिवशी विद्वान सरपंच बाई प्रियांका दीपक मढवी यांनी कामाचा आदेश सोहम कंट्रक्शन कासारभट यांना दिला आणि दिनांक.16/12/2019 रोजी ठेकेदारास धनादेश स्वरूपात रक्कम देऊन खर्चास मंजुरी दील्याबाबतचा दाखला दिला तसेच महत्त्वाची बाब म्हणजे एका विकास कामासाठी दोन वेळा निधी काढल्यामुळे वरील गैरवर्तणूकीबद्दल चिरले ग्रामपंचायतीचे ग्रामसेविका बाई आसावरी रंजीत कदम तसेच सरपंच बाई प्रियंका दीपक मढवी व विद्वान सदस्य निवृत्ती धनाजी पाटील यांनी बेजबाबदारपणे आपापसात संगणमत करून केवळ पैशाच्या हव्यासापोटी वरील चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामविकासासाठी आलेल्या रकमेची अफरातफर केली म्हणून मा.कोकण आयुक्त नवी मुंबई यांच्या न्यायालयात ग्रामस्थ दीपक परशुराम पाटील रा.जांभूळपाडा यांनी तक्रार दाखल केली त्याबाबत तक्रारदारातर्फे न्यायालयीन कामकाज उरणचे नामांकित वकील ॲड.निग्रेश गजानन पाटील काम पाहणार आहेत. तसेच विद्यमान उपसरपंच श्री समाधान भरत माळी यांनी सांगितले की, चिरले ग्रामपंचायतीमध्ये गैरवर्तणूक होत आहे नक्कीच कारण ज्या दिवशी ठराव मंजूर केले जातात त्यावेळी प्रथम हजर असलेल्या सदस्यांच्या सर्वांच्या उपस्थित म्हणून सह्या घेतल्या जातात आणि मीटिंग झाल्यानंतर मागाहून मर्जीने ठराव लिहले जातात त्यामुळे सदरच्या ठरावावर देखील तसेच झालेले आहे अशा प्रकारचा ठराव माझ्यासमोर कधीही झालेला नव्हता व नाही ज्यांनी शासनाचे पैशाची अफरातफर केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे हे योग्य आणि न्याय आहे विकासाच्या नावाखाली गोरगरीब जनतेच्या पैशाची आणि 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत ग्रामविकासासाठी आलेल्या पैशाची जर विद्वान सरपंच बाई, विद्वान सदस्य व विद्वान ग्रामसेविका बाई यांनी संगनमत करून पैसे खाल्ले असतील तर अशा विद्वानांना कायद्यानुसार शिक्षा नक्कीच झाली पाहिजे असे सांगितले. तसेच माजी उपसरपंच समीक्षा सारंग मढवी यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीचा तसेच शासनाचा निधी तसेच ग्रामपंचायतीमधील तमाम सर्वसामान्य जनतेचा घेतली जाणारी घरपट्टी कर स्वरूपातील रक्कम व 14 व्या वित्त आयोगातून आलेला निधी ग्रामविकाससाठी वापरला पाहिजे परंतु यामध्ये गैरवर्तणूक होत असेल तर गैरवर्तणूक करणाऱ्या विद्वान सरपंच, विद्वान सदस्य, ग्रामसेवक यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे हे न्याय उचित आहे. ग्रामपंचायतीमध्ये आर्थिक गैरवर्तणूक झाली असेल तर जबाबदार विद्वान सरपंच, विद्वान सदस्य, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल होऊन शिक्षा नक्कीच झाली पाहिजे असे सांगितले. चिरले ग्रामपंचायतीमध्ये गैरवर्तणूक होत आहे नक्कीच कारण ज्या दिवशी ठराव मंजूर केले जातात त्यावेळी प्रथम हजर असलेल्या सदस्यांच्या सर्वांच्या उपस्थित म्हणून सह्या घेतल्या जातात आणि मीटिंग झाल्यानंतर मागाहून मर्जीने ठराव लिहले जातात त्यामुळे सदरच्या ठरावावर देखील तसेच झालेले आहे अशा प्रकारचा ठराव माझ्यासमोर कधीही झालेला नव्हता व नाही. तसेच चिरले ग्रामस्थ संतोष दुकल्या मढवी यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीमध्ये झालेली आर्थिक स्वरूपाची अफरातफर ही निंदनीय असून जनतेने विश्वासाने निवडून संबंधित जबाबदार विद्वान सरपंच, विद्वान सदस्य यांनी अक्षरशः जनतेची फसवणूक केलेली आहे. म्हणून पैशाच्या गैरवर्तणूकीचा ग्रामपंचायत चिरलेचे जबाबदार विद्वान सरपंच, विद्वान सदस्य, ग्रामसेवक यांच्यावर संगनमताने आर्थिक अफरातफर केली म्हणून जाहीर निषेध व्यक्त केला.
तसेच चिरले ग्रामस्थ सारंग राम मढवी यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीमध्ये अफरातफर नक्कीच झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात विद्वान सरपंच प्रियांका दीपक मढवी तसेच विद्वान ग्रामसेविका आसावरी कदम आणि विद्वान सदस्य निवृत्ती धनाजी पाटील यांना अधिकारपदावरून काढून टाकण्यासाठी तक्रारदाराने केलेली तक्रार ही योग्यच आहे कारण चुकीला माफी नाही.
सदर याचिकेबाबत मा.आयुक्त कोकण विभाग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांना लेखी कळविले की, सरपंच प्रियांका दीपक मढवी व माजी उपसरपंच निवृत्ती धनाजी पाटील, चिरले ग्रामपंचायत, तालुका उरण, रायगड यांचेवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या कलम 39 (1) प्रमाणे कार्यवाही करून सदर कार्यवाहीचा स्पष्ट अभिप्रायासह परिपूर्ण अहवाल या कार्यालयात सादर करण्यात यावा असे कळविले त्यामुळे सध्या संपूर्ण तालुक्याचे लक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड यांच्या अहवालावर लागून राहिलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *