पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी सनी जमादार यांची निवड..

पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी सनी जमादार यांची निवड..
पनवेल, दि.28 (वार्ताहर) ः पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत उपाध्यक्षपदी सनी जमादार यांची निवड करण्यात आली आहे.
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष व पनवेल महापालिकेचे नगरसेवक सतीश पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. याबद्दल त्यांचे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष डॉ.शिवदास कांबळे यांनी अभिनंदन केले आहे. या नियुक्तीच्या वेळी पनवेल तालुका (ग्रामीण) युवक अध्यक्ष सनी फडके हे प्रामुख्याने उपस्थित होते. या निवडीबद्दल सनी जमादार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *