नशामुक्ती अभियानांतर्गत गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केली लक्झरी बससह टेम्पोवर कारवाई ; 61,68,320 किंमतीच्या गाड्यांसह गुटखा हस्तगत..

नशामुक्ती अभियानांतर्गत गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने केली लक्झरी बससह टेम्पोवर कारवाई ; 61,68,320 किंमतीच्या गाड्यांसह गुटखा हस्तगत..
पनवेल, दि.28 (संजय कदम) ः पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग व अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी वेळोवेळी नशा मुक्त नवीमुंबई अभियाना दरम्यान गुटखा व इतर नशेली पदार्था विरोधात कठोर कारवाई करण्या बाबत आदेशित केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलने पनवेल परिसरातून लक्झरी बससह, टेम्पो कारवाई करीत मोठ्या प्रमाणात गुटखा हस्तगत केला आहे.
महाराष्ट्र मध्ये गुटखा बंदी असतानाही गुटखा विक्री करणारी अंतराज्य टोळी बाबत माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलला प्राप्त झाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद ढोले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गायकवाड,  सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे, पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे, पोलीस हवालदार सुनील साळुंखे, सचिन पवार, पोलीस नाईक सुनील कुदळे, चेतन जेजुरकर , इंद्रजीत कानू, सचिन म्हात्रे, पोलीस शिपाई आजिनाथ फुंदे, प्रवीण भोपी आदींच्या पथकाला मध्य प्रदेश राज्य येथुन एका प्रवाशी लक्झरी ट्रॅव्हल्समधुन मोठ्या प्रमाणात अवैधरित्या गुटखा वाहतुक करुन तो पनवेल मध्ये आणून  विविध ठिकाणी टेम्पोद्वारे वितरीत केला जातो अशी खात्रीशीर  गुप्त बातमी मिळाल्याने सदरबाबत अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ.बी.जी.शेखर पाटील व सहा. पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदशनाखाली गार्डन हॉटेल पनवेल येथे सापळा लावला असता  मध्यप्रदेश येथुन लक्झरी ट्रॅव्हल्समधुन आणलेला गुटखा घेवुन जाणारा टेम्पो मिळून आला. सदर टेम्पो मध्ये  एकूंण  6,68,320/- रु. किंमतीचा विमल व राजश्री  गुटखा मिळुन आल्याने गुटखा वाहतुक करणा-या इसमा कडे चौकशी करता ज्या प्रवाशी लक्सरी बस मधून सदरचा गुटखा मध्यप्रदेश वरून वाहतूक केला ती बस च. झ. 09झ. -. 0450 ही सुद्धा गुन्ह्यात जप्त करण्यात आली आहे.  आरोपींविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई गु.रजी.क्र. 445/2020 अन्नसुरक्षा मानदे अधिनियम कलम 26,27 भा.दं.वि. कलम 188,272,273,328 प्रमाणे गुन्हा नोंद करुन आरोपी इर्शाद सैजुद्दिन अन्सारी वय 32 वर्षे रा. शाहबाज गाव, बेलापुर गुटखा मागिवणारा, टेम्पो चालक राज रामा साळुंखे, वय-38 वर्षे, रा. बेलापुर गाव, बस चालक अशपाक कालू खा. व्हिले दुधी ता. धर्मपुरी जि. दहाद म. प्र यांना अटक करण्यात आली आहे. लक्झरी बस व टेम्पोसह गुटखा मिळून एकूण 61,68,320/- किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *