युनिकॉर्न मोटार सायकलसह इसम बेपत्ता..

युनिकॉर्न मोटार सायकलसह इसम बेपत्ता..
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः होंडा कंपनीची राखाडी रंगाची युनिकॉर्न मोटार सायकलने देवीचापाडा येथे जातो असे सांगून घराबाहेर पडलेला 25 वर्षीय इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
राकेश लक्ष्मण पाटील (25 रा.मोहोदर) असे या इसमाचे नाव असून रंगाने गोरा, उंची 5 फूट, अंगाने मजबूत, चेहरा उभट, डोक्याचे केस वाढलेले असून अंगात पिवळ्या व पांढर्‍या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पायात पिवळ्या रंगाचे बुट व सोबत मोबाईल फोन आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दूरध्वनी 27452444 किंवा सहा.पो.उपनिरीक्षक मनोहर चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *