कामोठे वसाहतीत बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई..
कामोठे वसाहतीत बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई..
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या बांधकाम तसेच व्यवसाय सुरू करण्यात आले होते. त्याच्या विरोधात अनेक तक्रारी सिडको अतिक्रमण विभागाकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सिडको अतिक्रमण विरोधी पथकाने या भागात धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकामे, झोपड्या, उद्योगधंदे जमीनदोस्त केले आहेत.
गेल्या काही महिन्यापासून कामोठे वसाहतीमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत बेकायदेशीररित्या झोपड्या, बांधकामे, टपर्या, हातगाड्या लावण्यात आल्या होत्या. या संदर्भातील अनेक तक्रारी सिडको अतिक्रमण विभागाकडे स्थानिकांनी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत सिडकोच्या अतिक्रमण विभागाने जेसीबीसह इतर यंत्रणा राबवून ही बेकायदेशीर अतिक्रमणे पाडण्यात आली आहेत. या कारवाईला विरोध होवू नये म्हणून कामोठे पोलीस ठाण्याचे एक अधिकार्यांसह 10 कर्मचारी त्याचप्रमाणे सिडकोचे सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात तैनात होते. विविध भागातील 100 च्या वर बांधकामे पाडण्यात आली असून आगामी काळात सुद्धा अशा प्रकारची कारवाई यापुढे सुरू राहणार असल्याची माहिती सिडकोच्या संबंधित अधिकार्यांनी दिली.
फोटो ः बेकायदेशीर बांधकाम पाडताना.