वाहन मालकांची फसवणुक करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा (मध्यवर्ती कक्ष)ने केला पर्दाफाश ;सुमारे 2 कोटी 2 लाख रूपये किंमतीची वाहने हस्तगत..

कॉर्पोरेट कंपनी व हॉटेल मध्ये कार भाडेतत्वावर लावण्यासाठी घेवुन ती वाहने परराज्यात परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणुक करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश गुन्हे शाखा (मध्यवर्ती कक्ष)ने केला पर्दाफाश ;  सुमारे 2 कोटी 2 लाख रूपये किंमतीची वाहने हस्तगत
पनवेल, दि.27 (संजय कदम) ः कॉर्पोरेट कंपनी व हॉटेल मध्ये कार भाडेतत्वावर लावण्यासाठी घेवुन ती वाहने परराज्यात परस्पर विक्री करून वाहन मालकांची फसवणुक करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा (मध्यवर्ती कक्ष) ने पर्दाफाश केला असून सुमारे 2 कोटी 2 लाख रुपये किंमतीची वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. या टोळीतील मुख्य आरोपी अटक केल्याने मोठ्या प्रमाणात अजून वाहने पोलीस हस्तगत करतील असा विश्‍वास नवी मुंबईचे आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी व्यक्त केला आहे.
नेरूळ , नवी मुंबई येथे ’ ट्रॅव्हल्स पॉईट ’ कंपनीच्या नावाने ऑफिस सुरू करून तेथे भाडे करार करून भाडेतत्वावर मुळ कागदपत्रासह वाहने घेवुन ती परस्पर विक्री करून वाहन दोन तिन महिन्यामध्ये ऑफिस बंद करून फिर्यादी व साक्षीदार यांची फसवणूक केल्याबाबतच्या तक्रारीवरून नेरूळ पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. 110/2020 भा.द.वि. कलम 406,420 , 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे . बिपीन कुमार सिंह , पोलीस आयुक्त . , नवी मुंबई , डॉ . बी . जी . शेखर पाटील , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , नवी मुंबई , यांनी मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा , नवी मुंबई यांना नमुद गुन्हयातील आरोपींचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या . प्रविणकुमार पाटील , पोलीस उप आयुक्त , गुन्हे शाखा , विनोद चव्हाण , सहा . पोलीस आयुक्त , गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली एन.बी. कोल्हटकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , सपोनि राजेश गज्जल व पथक मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा , नवी मुंबई हे गुन्हयाचा तपास सुरू केला . नमुद गुन्हयातील आरोपी हे अतिशय सराईत असल्याने ते त्यांचा ठावठिकाणा व मोबाईल क्रमांक वारंवार बदलुन अस्तीत्व लपवुन राहत असल्याने त्यांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान होते . आरोपीचा शोध घेत असतांना आरोपी सत्यप्रकाश वर्मा उर्फ बाबू हा भोईसर परीसरात असल्याची माहिती मिळाल्याने तेथे जावुन आरोपी राहण्याचे ठिकाणाचा शोध घेवुन त्याचे घराची पाहणी केली तेथे त्याची पत्नी राहत होती तो घरी येताच त्यास ताब्यात घेण्यासाठी तो राहत असलेल्या इमारती मध्येच एक रूम भाडयाने घेवुन तेथे पोलीस पथक थांबवुन ठेवले होते . दिवसरात्र पाळत ठेवली असतांना सातव्या दिवशी तो त्याचे घराजवळ येताच त्यास शिताफीने ताब्यात घेतले व त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याची माहिती दिल्याने व त्याचा गुन्हयांतील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक केली त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये त्याचे साथीदार आशिष पुजारी व अ‍ॅन्थोनी पॉल हे बेंगलोर येथे असल्याची माहिती दिल्याने तात्काळ सपोनि गज्जल व पथक बेंगलोर येथे जावुन आरोपींचा शोध घेत असतांना ते एका हॉटेल मध्ये राहत असल्याची माहिती प्राप्त करून पथकातील पाशि / राहुल वाघ यास हॉटेलचे वेटरचा वेश परिधान करून पाळत ठेवुन आरोपी हॉटेलच्या रूम मध्ये येताच पथकाने त्यांना ताब्यात घेतले व त्यास अटक करण्यात आली आहे . अशा प्रकारे सत्यप्रकाश मिठाईलाल वर्मा उर्फ बाबु , वय 30 वर्षे , धंदा वाहन चालक , वय -30 वर्षे , रा . रा . रूम नं . 01 , बालाजी अपार्टमेंट , फुलवाडा रोड , विरार ( ईस्ट ) , ता . वसई जि . पालघर, आशिष गंगाराम पुजारी , वय 32 वर्षे , शिक्षण – बी.एस.सी , रा . गांधी नगर , पालघर, अयान उर्फ राहुल उर्फ अ‍ॅन्थोनी पॉल छेत्तीयर , वय 38 वर्षे , शिक्षण -12 वी / हॉटेल मॅनेजमेन्ट , रा . बी / 11 , नसीम चाळ , मरोळ नाका , चिमॅट पाडा , मरोळ फायर ब्रिगेड जवळ , मुंबई नमुद आरोपी संगनमताने वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळया नावाने ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑफिस सुरू करून या व्यवसायाचे अनुभव असणारे 4 ते 5 महीला / पुरुष स्टाफ नोकरीस ठेवतात . त्या नंतर आ.क. 3 हा परराज्यांत राहुन तेथुन गाडी भाडयाने देणा – या लोकांची ओएलएक्स व इतर माध्यमातुन माहिती घेवुन त्यांना फोन वरून संपर्क करून गाडी भाडयाने देण्याबाबत चर्चा करून कंपनीचे ऑफिस मध्ये पाठविले नंतर आ.क्र .1 व 2 हे वाहन मालकांचा भाडे करार करून त्यांचेकडुन वाहनाची मुळ कागदपत्रे व वाहन ताब्यात घेतात त्याच वेळी त्यांना ठरेलेले मासिक भाडे सुरू करतात . त्यानंतर त्या गाडया गुजरात येथील त्यांचे साथीदाराना परस्पर 3 ते 4 दिवसात कमी किंमतीमध्ये विक्री करतात . विक्री करून आलेल्या रक्कमे मधुनच दोन ते तीन महीने गाडी मालकांना ठरलेले मासिक भाडे देतात त्यानंतर कंपनीचे कार्यालय 2/3 महीने चालु ठेवुन जास्तीत जास्त वाहने जमा झाल्यानंतर कंपनीचे कार्यालय तसेच आरोपी हे त्याचे मोबाईल कायमचे बंद करून पोबारा करतात . तपासा दरम्यान गुजरात येथुन नमुद गुन्हयांतील गाडया विक्री करणारे मोहम्मद वसीम मोहम्मद फरीद शेख , वय 33 वर्षे , रा . मोरा भागल ताज सोसायटी , सुरत,  जावेद अब्दुलसत्तार शेख उर्फ मामा , वय 46 वर्षे , रा.जी 4 , अ‍ॅडव्हान्स अपार्टमेंन्ट , दमन . यांना ताब्यात घेवून अटक केली आहे . त्याचेकडे केलेल्या तपासामध्ये आरोपी क्र . 1 ते 3 यांनी पाठविलेली वाहने ते सुरत , अहमदाबाद , वापी , दमन , बलसाड या भागात कमी किंमतीमध्ये विक्री केल्याची गहाण ठेवल्याची माहिती दिली . तसेच सर्व आरोपींनी संगनमताने नेरुळ , मरोळ -अंधेरी व येरवडा , पुणे येथे अशा प्रकारे कंपनीचे ऑफिस सुरू करून वाहन मालकांची फसवणूक करून परस्पर विक्री केलेल्या स्कॉर्पिओ , इन्होवा – क्रिस्टा , व्हेन्टो , झायलो , एसेंट , इस्टीगा , होंडा बीआरव्ही , वॅनगर , डिझायर , सेलेरीओ इत्यादी सुमारे 1 कोटी 21 लाख रूपये किंमतीची 20 वाहने खालील प्रमाणे हस्तगत करण्यात आलेली आहेत . तसेच नेरूळ पोलीस ठाणे या गुन्हयांतील 16 वाहनापैकी सुमारे 81 लाख रूपये किंमतीची 0 9 वाहने गुजरात राज्यातील वेगवेगळया पोलीस ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी दारू तस्करीमध्ये जप्त केले असल्याचा शोध घेतला असुन नमुद गुन्हयाचे तपासामध्ये आता पर्यंत सुमारे 2 कोटी 2 लाख रू . किंमतीची वाहने हस्तगत करण्यात आलेली आहेत . गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपींकडुन अशाच प्रकारे वाहने विक्री केलेले खालील दोन गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. दिंडोशी पोलीस ठाणे , 9 4 / 2020 भा.द.वि. कलम 406 , 420,34 , – ( वाहने -10 ), येरवडा पोलीस ठाणे , गु.रजि.नं. 2121/2020 भा.द.वि. कलम 406 – ( वाहने -7 9 ) तसेच नमुद सराईत अटक आरोपी व त्याचे साथीदारां विरूध्द अशाच प्रकारचे आंबोली पोलीस ठाणे , गु.रजि.नं. 550/2018 भा.द.वि. 420 , 406,34 , आंबोली पोलीस ठाणे , गु.रजि.नं. 11 / 201 9 भा.द.वि. 420 , 406,34, ओशीवरा पो . ठा . गु.र.न. 2 9 4 / 1 9 भादविक . 420 , 406 , 465 , 467 , 468 , 471 , 34, आझाद मैदान पोलीस ठाणे गु.रजि.नं. 236 / 201 9 भा.द.वि. कलम 420 , 406 , 34, विरार पोलीस ठाणे गु.रजि.नं. 758/2018 भा.द.वि. कलम 406, वरळी पोलीस ठाणे , गु.रजि.नं. 2 9 3 / 201 9 भा.द.वि. कलम 420 , 406,34 यातील आरोपी अयान उर्फ राहुल उर्फ अ‍ॅन्थोनी पॉल छेत्तीयर , हा या टोळीचा मुख्य सुत्रधार असुन तो पकडले जावु नये म्हणुन परराज्यात बेंगलोर येथे राहुन दुबई येथील मोबाईल कंपनीचे सिमकार्ड द्वारे व्हॉट्सअप कॉलचा वापर करून अतिशय नियोजनबध्दरित्या रॅकेट चालवित होता व अदयाप पर्यंत वरील गुन्हयात फरार होता , त्यास गुन्हे शाखा , नवी मुंबईने अटक केली आहे . नमुद गुन्हेगारांची आंतराज्यीय टोळी असून त्यांनी अनेक ठिकाणी अशी कार्यालये सुरू करून शेकडो वाहन मालकांची फसवणूक केल्याचे तपासामध्ये दिसून आले आहे . नमुद गुन्हयातील इतर आरोपी व उर्वरीत वाहने हस्तगत करण्याबाबत तपास चालू आहे . तसेच , अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरीकांनी मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखा , नवी मुंबई येथे संपर्क साधावा, असे आवाहन नवी मुंबईचे आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी केले आहे. सदरची उल्लेखनीय कामगिरी मध्यवर्ती कक्ष , गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर , सहा . पोलीस निरीक्षक राजेश गजजल , ज्ञानेश्‍वर भेदोडकर , निलेश तांबे , पोलीस अंमलदार संजय पवार , उर्मिला बोराडे , लक्ष्मण कोपरकर , राहुल वाघ , विजय खरटमो , किरण राऊत , मिथुन भोसले , नितीन जगताप , प्रकाश साळुखे , मेघनाथ पाटील , विष्णू पवार , पोपटे पावरा , आतिश कदम , सतिश सरफर , सचिन टिके , सतिश चव्हाण व रूपेश कोळी अशा पथकाने केलेली असून पुढील तपास सहा . पोलीस निरीक्षक राजेश गज्जल करत आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *