श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे गरजवंतांना धान्याचे वाटप
पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या अनेक कामगारांना एक वेळचे जेवण मिळणे मुश्कील झाले आहे. अशा बाबतच्या अनेक मागणी वजा तक्रारी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीकडे येताच आज श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट व पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीतर्फे धाकटा खांदा परिसरातील व खांदा वसाहत परिसरातील नागरिकांना व गरजवंतांना धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अॅड.मनोहर सचदेव यांच्यासह पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सचिव मंदार दोंदे,, कार्याध्यक्ष संजय कदम, विवेक पाटील आदींनी त्यांना त्यांच्या परिसरात जावून धान्याचे वाटप केले. तसेच यापुढे सुद्धा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या माध्यमातून पनवेल परिसरातील व तालुक्यातील बांधवांसाठी गरजेनुसार धान्य वाटप केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी यावेळी दिली.