पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची नवी कार्यकारणी जाहीर. समितीच्या अध्यक्षपदी रत्नाकर पाटील…

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची नवी कार्यकारणी जाहीर. समितीच्या अध्यक्षपदी रत्नाकर पाटील तर उपाध्यक्षपदी केवल महाडिक, सरचिटणीसपदी रवींद्र गायकवाड तर खजिनदारपदी हरेश साठे.
पनवेल/प्रतिनिधी
पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ पत्रकार व समितीचे सल्लागार सुनील पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी सन २०२० ते २०२१ या वर्षासाठी नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. कार्यकारणीत समितीच्या अध्यक्षपदी साप्ताहिक रायगड शिव सम्राट वृत्तपत्राचे संपादक रत्नाकर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी सामनाचे पत्रकार संजय कदम, उपाध्यक्षपदी कोकण संध्याचे मुख्य संपादक केवल महाडिक, सचिवपदी दै. पुढारीचे प्रतिनिधी रवींद्र गायकवाड, सहसचिवपदी आर्या प्रहारचे संपादक सुधीर पाटील, खजिनदारपदी पत्रकार हरेश साठे, सहखजिनदारपदी पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरघोडे यांची निवड करण्यात आली. पनवेल तालुक्यातील पत्रकारांचे संघटन होऊन ते पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांसाठी, न्याय हक्कांसाठी व संघटनात्मक भूमिका बजावण्यासाठी सन २०११ साली पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीच्या स्थापनेनंतर पत्रकारांच्या विविध प्रश्‍नांसाठी पत्रकारांनी एकत्र रस्त्यावर येऊन आपल्या प्रश्‍नांसाठी संघर्ष केले व त्यामध्ये पत्रकार यशस्वीहि झाले. पनवेल शहरामधील विविध प्रश्‍नांसाठी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने आवाज उठविला आहे. सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यामध्ये देखील समिती अग्रेसर आहे. संघटनेचे हे कार्य असेच अखंडित चालू राहण्यासाठी अग्रेसर असणार आहेत. पनवेल शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत या बैठकीत विविध विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. यावेळी नव्याने झालेले अध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी मावळत्या अध्यक्षांकडून पदभार स्वीकारला. या बैठकीत जेष्ठ पत्रकार व सल्लागार सुनील पोतदार, दीपक महाडिक, पत्रकार विवेक पाटील, मंदार दोंदे, अनिल भोळे, अरविंद पोतदार, भालचंद्र जुमलेदार, सुधीर पाटील, राजेश डांगळे, सुभाष वाघपंजे, सुनील कटेकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *