सांस्कृतिक वसा जपण्याचे काम ओरियन मॉलने पहिल्यापासून केले आहे…

सांस्कृतिक वसा जपण्याचे काम ओरियन मॉलने पहिल्यापासून केले आहे ः मंगेश परुळेकर
पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः ओरियन मॉलच्या सुरूवातीपासून सांस्कृतिक वसा जपण्याचे काम येथील व्यवस्थापनाने केले आहे. याला पनवेलकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने आम्ही यशस्वी झालो ही सर्व ईश्‍वराची कृपा असल्याचे नम्रपणे प्रतिपादन ओरियन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी आज ओरियन मॉलमध्ये आयोजित विविध योजनांचा शुभारंभ करताना केले.
सध्याच्या लॉकडाऊन व कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक मॉल बंद पडले तर कित्येक मॉलमधील दुकाने उघडली नाही आहेत. परंतु याला पनवेलमधील ओरियन मॉल हे अपवाद ठरलं ते फक्त पनवेलकरांनी केलेल्या सहकार्यामुळे. सोशल डिस्टन्सिंग पाळून ओरियन मॉलमध्ये ग्राहक उत्स्फूर्तपणे येत आहेत. पिव्हीआरमध्ये चित्रपट सुद्धा सुरू झाले आहेत. हॉटेल व्यवसाय येथे वाढला आहे. याला पाठींबा पनवेलकरांनी दिला आहे. प्रत्येक वर्षी ओरियन मॉलमध्ये आपली संस्कृती जपली जाते. दिवाळीच्या काळात रांगोळीला महत्वाचे स्थान आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही यावर्षी कोरोना योद्धा म्हणून सढळ हस्ते मदत करणारे रतन टाटा नुकतीच मुंबई इंडियन्स जिंकलेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा त्याचे नेतृत्व करणारे रोहित शर्मा त्याचप्रमाणे आपल्या देशाची एक यशस्वी अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांची अदा असलेली रांगोळी मुख्य प्रवेशद्वारासमोर रेखाटण्यात आलेली आहे व ही रांगोळी खरेदी करण्यासाठी येणार्‍यांसाठी आकर्षण ठरली आहे. त्याचप्रमाणे येथे येणार्‍या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ सह वेगवेगळ्या योजनांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यायोगे ग्राहक मनमुराद खरेदी करतील व कोरोनाची भिती आपण भोगलेले गेल्या सात महिन्यापासूनचे वाईट दिवस विसरुन जातील व या दिवाळीच्या शुभारंभाला नवीन जीवनाला आपण सुरूवात करू असे आवाहन त्यांनी या माध्यमातून सर्वांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *