बेकायदेशीर रेशनकार्डातील उत्पन्न कमी व बायोमेट्रीक करून बारकोड नंबर देणार्‍या दलालांविरुद्ध कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी…

बेकायदेशीर रेशनकार्डातील उत्पन्न कमी व बायोमेट्रीक करून बारकोड नंबर देणार्‍या दलालांविरुद्ध कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी
पनवेल, दि.30 (वार्ताहर) ः बेकायदेशीर रेशनकार्डातील उत्पन्न कमी व बायोमेट्रीक करून बारकोड नंबर देणार्‍या दलालांविरुद्ध कारवाई करण्याची शिवसेना पनवेल तालुका संघटक व रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष पनवेल भरत पाटील यांनी पनवेलचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात भरत पाटील यांनी म्हटले आहे की, काही दलाल (एजंन्ट) तहसिल कार्यालयातील पुरवठा,सेतू व संगणक विभागातील कर्मचा-यांच्या मदतीने ,रेशनकार्डातील उत्पन्न कमी करून ,कमी उत्पन्नाचे रेशनकार्ड देणे तसेच बायोमेट्रीक करून वारकोड नंबर देत असले बाबत पनवेल तालुक्यात व तहसिल कार्यालयात कार्यरत आहेत. वास्तविक पहाता पुरवठा विभागातील कर्मचा-यांना रेशन कार्डातील उत्पन्न कमी करून व कमी उत्पन्नाचे रेशनकार्ड देण्यांचा अधिकार नाही रेशनकार्ड धारकांनी त्याबाबत रितसर तहसिलदार कार्यालयात अर्ज करून ,तहसिलदारांनी शेरा सारून अर्ज चौकशीसाठी तलाठी-सजा यांचेकडे पाठविणे तसेच ग्रामीण भागात गावातीत्ल व शहरी विभागात वार्डातील पंचाच्या समक्ष पंचनामा करून ,प्रस्ताव नियमानुसार कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर रेशनकार्डालील उत्पन्न कमी करून व कमी उत्पन्नाचे अथवा उत्पन्नानुसार रेशनकार्ड देणे बाबत कारवाई करणे आवश्यक आहे. पनवेल तालुक्यातील दुकानदारांच्याकडे याबाबत चौकशी केली असता असे कळले की मार्च 2020 ते ऑक्टोंबर 2020 पर्यंत रेशनकार्डातील उत्पन्न कमी करून व कमी उत्पन्नाचे अनेक रेशनकार्ड देण्यांत आलेले आहेत.तसेच रेशनकार्डातील उत्पन्न कमी करून देण्यासाठी व कमी उत्पन्नाचे रेशनकार्ड बनवून देण्यांसाठी काही दलाल (एजन्ट) पुरवठा,सेतू व संगणक कार्यालयातील कर्मचा-यांना चिरीमिरी देवून त्वरीत काम करून घेतात व स्वतः दलाल हजारो रूपये घेवून मालामाल होतात याची सुध्दा चौकशी होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *