अन्यायग्रस्त कामगारांच्या हाकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ..
अन्यायग्रस्त कामगारांच्या हाकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ.. कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा..
पनवेल वार्ता प्रतिनिधी : शुभांगी पवार.
पनवेल : SadoFax या ऑनलाईन कंपनीच्या कामगारांसोबत अन्याय होत असल्याचे पनवेल तालुका सचिव श्री. अमोल देविदास पाटील व नवीन पनवेल उप शहर अध्यक्ष श्री. यतीन विनायक देशमुख यांच्या निदर्शनास आले, त्यानुसार SadoFax या ऑनलाईन कंपनीच्या मॅनेजमेंटच्या अधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली. व कामगारांच्या न्याय हक्कांसाठीच्या मागण्यांचे निवेदन शाडोफॅक्स कंपनी व्यवस्थापनाला दिले.निवेदनात नमूद केल्याप्रमाणे उपरोक्त विषयास अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आपल्या निदर्शनास अनु इच्छितो की शाडोफॅक्स जी पनवेल येथे नवीन कंपनी चालू झाली आहे त्या कंपनित सर्व मराठी मुले काम करत असून पनवेल मॅनेजमेंट व वरील टीम त्या कामगारांना विश्वासात न घेता कोणत्याही प्रकारची माहिती न देता अचानकपणे पर हेड दिवसाचा पगार 800 वरून 500 करण्यात आला, मुले लोकेशन वर असली तरी त्यांचा पगार कपात केला जातो, कामगारांचा असा म्हणणं आहे की 10 तास ऑनलाइन राहावं लागतं तरी त्यांचा जो C.P.S जो स्कोर तो देखील कमी दाखवत आहे.त्यांचा पगार कापणे, विनाकारण जर कामगारांना त्रास देत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.
आमच्या अर्जाची योग्य ती दखल घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावावे, आणि पुढे त्यांना विनाकारण काही त्रास देयु नये. तसे झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल.असा इशारा यावेळी देण्यात आला. कामगारांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत.
1) CPS स्कोर ची विंडो असावी मोबाईल स्क्रीन वर
2)MG 800 रुपये असावी
3) लोकेशन चा प्रॉब्लेम
4)आठवड्याचे 8 दिवस ऑनलाइन असून 2 दिवसाचे पगार कट करण्याबाबत
5) कामगारांचा कोणाचा पणइन्शुरन्स नाही
6)2 आठवडे पगार लेट दिला जातो
7) मॅनेजर ने नेहमी आठवड्यातून एकदा येऊन विजिट करावे.
या प्रमुख मागण्यांचे निवेदन देऊन SadoFax या ऑनलाईन कंपनीच्या कामगारांसोबत मॅनेजमेंटच्या अधिकारी यांच्याशी
पनवेल तालुका सचिव श्री. अमोल देविदास पाटील व नवीन पनवेल उप शहर अध्यक्ष श्री. यतीन विनायक देशमुख यांनी
चर्चा केली. वाढीव पगार 2 ते 3 दिवसात लागू करून बाकीच्या मागण्या देखील पूर्ण करू असे मॅनेजमेंट ने यावेळी आश्वासन दिले.