मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध सुरू…

मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध सुरू….
पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः पनवेल जवळील पळस्पे जेएनपीटी लेनवर झिरकॉन एन एस ए-1 कंपनीच्या कंपनीसमोर ट्रेलरच्या धडकेने इसमाचा मृत्यू झाला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
सदर इसमाचे अंदाजे वय 35 ते 40 वर्षे केस वाढलेले, दाढी वाढलेली, नाक सरळ असून अंगात काळ्या रंगाचा फुल बाह्याचा टी-शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, त्याचप्रमाणे डाव्या हाताच्या मनगटावर मुकेश लाल भसवी असे गुजराती भाषेत गोंदलेले आहे. त्याचप्रमाणे डाव्या पायाच्या घोटाला पट्टी केलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी 27452333 किंवा सहा.पो.नि.निशांत धनवडे यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *