सर्वसामान्य नागरिकांसाठी शिवसेनेतर्फे उभारण्यात आले कामोठ्यात वाचनालय..

सर्वसामान्य नागरिकांसाठी शिवसेनेतर्फे उभारण्यात आले कामोठ्यात वाचनालय
पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः कामोठे शहर येथे शिवसैनिक अर्जुन चिकले यांच्या संकल्पनानुसार शिवसेना शाखाप्रमुख सेक्टर 24 प्रभाग 11. संदिप झावरे व सागर भोर शाखाप्रमुख सेक्टर 25 प्रभाग 11 यांच्या सौजन्याने व कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत वाचनालय चे उद्घाटन शिरीष घरत रायगड जिल्हा प्रमुख व बबन दादा पाटील रायगड जिल्हा सल्लागार, रामदास शेवाळे पनवेल महानगरप्रमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रभाकर दादा गोवारी शिवसेना कामोठे उपमहानगर प्रमुख व बबन काळे शिवसेना कामोठे शहर संघटक, संतोष गणपत गोळे उपशहरप्रमुख उमेश खेडेकर उपशहरप्रमुख, विलास भाई कामोठकर विभाग प्रमुख प्र.11 सौ रेवती सपकाळ विधानसभा संघटिका, अँड सुलक्षणा जगदाळे शहर संघटिका, सौ संगीता राऊत विभाग संघटिका प्रभाग 12,सौ सोनल तांबे उपविभाग संघटिका प्रभाग 12, सौ,सुवर्णा वाळूंज उपशहर प्रमुख शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष व धाया गोवारी माजी शहरप्रमुख, रामदास गोवारी व कामोठे शहर मधील सर्व पदाधिकारी,शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, व आजी माजी पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *