कोरोना योद्ध्यांचा करण्यात आला शिवसेनेतर्फे सत्कार…

कोरोना योद्ध्यांचा करण्यात आला शिवसेनेतर्फे सत्कारपनवेल, दि.24 (वार्ताहर)- कोरोनाच्या काळामध्ये दिवसरात्र मेहनत कऱणाऱ्या तसेच बाधितांना योग्य ती सेवा पुरविणाऱ्या व्यक्तींचा शिवसेना व युवासेनेतर्फे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.        पडघे गावामधील कोरोना काळात, कोरोना योध्ये रात्रंदिवस मेहनत करत आहेत. कोरोना बाधितांना योग्य ती सेवा पुरवत आपले कर्तव्य यशस्वी रित्या पार पाडत आहेत. डॉ. अमोल राजे, डॉ. अपर्णा गायकवाड, डॉ.के.के.दुबे, डॉ.अमर राजे, डॉ.पटेल, त्रिमूर्ती मेडिकल, माउली मेडिकल, श्री समर्थ मेडिकल, श्री मेडिकल, तसेच अडागळे (तळोजा पो. स्टेशन), सुर्यवंशी (तळोजा पो.स्टेशन) या कोरोना योध्यांच्या कार्याची दखल घेत. जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सदीच्छा भेट घेऊन त्यांचा विशेष सत्कार केला. यावेळी महानगरप्रमुख रामदास शेवाळे, दिनेश हि.भोईर (युवासेना उपविभाग अधिकारी), हिरामण का. भोईर (मा.शिवसेना विभाग प्रमुख),,अनंता भोईर (मा.सरपंच पडघे) आदी उपस्थित होते.
         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *